पीएम किसान योजना 14 वा हप्ता मिळणार पहा संपूर्ण माहिती



JOIN FACEBOOK GROUP
नमस्कार शेतकरी मित्रांनो,

आज आपण पीएम किसान योजनेचा चौदावा हप्ता जो सरकार कडून थांबला होता त्याची संपूर्ण माहिती  घेणार आहोत भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी हे येणाऱ्या 28 जुलै   2023 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टोटल दोन हप्ते म्हणजे चार हजार रुपये DBT च्या माध्यमातून वितरित करणार आहेत.


यापूर्वी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेच्या बाबतीत सर्व बाबी पूर्ण करण्यासाठी अनेक  संधी देण्यात आल्या आहेत,  त्यामुळे जे शेतकरी वेळेत पीएम किसान योजनेचे डॉक्युमेंट  किंवा लागणाऱ्या गोष्टी अपडेट केलेला नाहीत अशा शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार नाही.  ज्या शेतकऱ्यांनी सर्व माहिती आणि कागदपत्रे जमा केलेत अशा शेतकऱ्यांना हा लाभ  मिळणार आहे.

                      

मागेल त्याला शेततळे योजना 2023 संपूर्ण माहिती


तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहे किंवा नाही यासाठी आपणास पीएम किसान या पोर्टल वर जाऊन बेनेफेसरी स्टेटस लिस्ट मध्ये आपले नाव आहे की नाही हे चेक करायचे आहे .


कोणते महत्त्वाचे चार असे मुद्दे चेक करायचे आहेत ते आपण आता खाली पाहूया 


1) सर्वप्रथम पीएम किसान चे अधिकृत संकेतस्थळ ओपन करा. 

2)  बेनेफेसरी स्टेटस Yes आहे का चेक करा.

3) आधार बँक अकाउंट सीडिंग स्टेटस Yes आहे का पहा.

4) E-KYC Yes आहे का चेक करा.


सर्व ठिकाणी Yes असणे आवश्यक आहे, तसेच हिरवा टिकमार्क आहे का ते पण तपासून घ्या.


त्यानंतर खालील बाजू लेटेस्ट इंस्टॉलमेंट details Yes आहे का ते पहा.


5) FTO Processed Yes आहे का ते पहा.


आत्ता चेक करा सर्व चार ठिकाणी हिरवा टिक मार्क आहे का ? जर त्या पानावर चार टिकमार्क हिरव्या कलरचे असतील तर नक्कीच 4000 रुपये चा हप्ता तुम्हाला भेटणार.


आत्ता View account details हा पर्याय ओपन करा आणि पेमेंट mode जर आधार दाखवत असेल, तर तुमचं जे बँक खातं आधार सोबत लिंक आहे त्या खात्यात येणाऱ्या 28 तारखेला 14 वा हप्ता जमा होणार आहे.


अधिक माहितीसाठी खालील फोटो पहा.




प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी जे शेतकरी पात्र असणार आहेत त्याच शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या  नमो शेतकरी महा सन्मान  योजनेचे लाभ भेटणार आहेत.

यासाठी राज्यातील कृषी विभागामार्फत मार्फत शेतकऱ्यांचे आधार शेडिंग इ केवायसी व लँड शेडिंग या सर्व गोष्टी तपासून घेण्यात येत आहेत.  

या सर्व गोष्टीची खात्री शेतकऱ्यांनी करावी व लवकरात लवकर या योजनेचा लाभ घेण्यासाठी जवळच्या सीएससी केंद्राला भेट देऊन योजनेचा लाभ घ्यावा 

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url