कापसाचा बाजार भाव पहा - कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता
नमस्कार शेतकरी मित्रांनो,
आज आपण कापसाच्या भावा विषयी चर्चा करणार आहोत
देशातील बहुसंख्य भागात पावसाचे प्रमाण अनिश्चित झाले असून कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होऊन सुद्धा यंदाच्या वर्षी कापसाचे उत्पादन कमी होणार असे दिसून येत आहे.
याचाच परिणाम म्हणजे येणाऱ्या काही दिवसात कापसाच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढणार आहेत.
वाचा - बाजारभाव - 18 August 2023 - कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे
वाचा - नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत आहात ? खरेदी करण्यापूर्वी वाचा
वाचा - कापूस - कीड व्यवस्थापन - मार्गदर्शन
कापसाचा बाजार भाव - 18 August 2023
|
बाजार समिती |
परिमाण |
कमीत कमी दर |
जास्तीत जास्त दर |
सर्वसाधारण दर |
|
सेलु |
क्विंटल |
6800 |
8035 |
7975 |
|
आर्वी |
क्विंटल |
7700 |
7800 |
7750 |
|
खामगाव |
क्विंटल |
7000 |
7900 |
7450 |
|
यावल |
क्विंटल |
6050 |
7050 |
6570 |
|
पुलगाव |
क्विंटल |
7600 |
7700 |
7650 |
मागील काही दिवसाचा कापसाच्या भावाचा विचार केल्यास भाव दिवसेंदिवस वाढतच आहे.
उदाहरणार्थ :
13 - 08 - 2023 ला सात हजार सातशे रुपये दर होता तो आता वाढून आठ हजार 35 पर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कापसाचे चांगले उत्पादन भेटेल त्यांना यावर्षी अधिक चांगला आर्थिक नफा होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विचार करून कापसाची विक्री करावी.
- कापसाचा भाव का वाढला आहे.
1) अनिश्चित मान्सून पाऊस
महाराष्ट्र सह देशातील बहुतांश भागांमध्ये यावर्षी पावसाचे प्रमाण खूपच कमी झाले आहे त्यामुळे याचा विपरीत परिणाम कापसाच्या पिकावर होत आहे एक तर पेरणी उशीर झाली त्यांनी झाल्यानंतर काही दिवस पावसाने चांगले हजेरी दिली होती पण आता कपाशीचे पीक मोठे होत असताना पावसाने दडी मारली आहे त्यामुळे यावर्षी कापसाच्या उत्पादनात मोठी घट दिसत आहे त्यामुळे त्यामुळे बाजारात कापसाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे .
2) आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या मागणीत वाढ
पावसाच्या धडे बरोबरच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे कापसाचे बाजार भाव 7000 वरून 8000 च्या पुढे गेलेले आहेत
काही तज्ञांच्या मते कापसाचे भाव जे आहेत 9000 च्या पुढेही जाऊ शकतात त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी चांगला कापूस पिकवला असेल अशा शेतकऱ्यांनी कापसाचा योग्यरित्या साठा करून योग्य बाजारभाव मिळाल्यानंतर विक्री करून अधिक नफा मिळवावा.
