मागेल त्याला शेततळे योजना 2023 संपूर्ण माहिती | Magel Tyala Shettale Online Apply


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


नमस्कार मित्रांनो,


 आज आपण महाराष्ट्र शासनाच्या मागेल त्याला शेततळे या योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र सरकार नेहमीच आपल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या लोकोपयोगी किंवा कल्याणकारी विविध प्रकारच्या योजना राबवत असते याच धोरणाला आन्सरून शेतकऱ्याची वाढती मागणी आणि महाराष्ट्रातील दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहता शासनाने शेततळे ही योजना सुरू केली आहे.

 या योजनेमुळे शेतीला पाण्याचा स्त्रोत उपलब्ध करून देण्यात येतो . महाराष्ट्रामध्ये काही वर्षापासून पावसाचे प्रमाण अनिश्चित  झालेले आहे. राज्यातील कोरडवाहू शेती ही पूर्णपणे मान्सूनच्या पावसावर अवलंबून असते. यामुळे शेतकऱ्यांना कोरडवाहू शेती करत असताना पाणी टंचाईला सामोरे जाऊन नुकसान सोसावे लागते याच कारणामुळे शेतीच्या उत्पादनावर परिणाम होत आहे.

शेतीचे उत्पादनामध्ये वाढ करून शेतकऱ्याला सुखी संपन्न करण्यासाठी तसेच पाणीटंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यासाठी शेततळे हे अत्यंत उपयुक्त आहे. आणि राज्यातील पावसावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढवणे तसेच स्थायी  सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मागेल त्याला शेततळे ही योजना सुरू केली आहे.


मागेल त्याला शेततळे योजना 2023 संपूर्ण माहिती  


ही योजना महाराष्ट्र शासनाने फेब्रुवारी 2016 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजूर केली होती आणि महाराष्ट्र जलसंधारण महामंडळासाठी दहा हजार कोटीची तरतूद करण्यात आली .

ही योजना शासनाचे अत्यंत महत्त्वकांक्षा योजना आहे या योजनेमधून राज्यातील पाणी टंचाईग्रस्त संकटग्रस्त जिल्ह्यामधील अल्पभूधारक शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

 त्या योजनेमध्ये विविध आकाराच्या शेततळ्याची मागणी करता येईल यामध्ये जास्तीत जास्त 30 * 30  *  3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल तसेच इनलेट आउटलेट विरहित प्रकारामध्ये किमान 20 * 15 * 3 मीटर या आकारमानाचे शेततळे घेता येईल ही योजना अनुदान पद्धतीने राबवण्याच्या शासनाचा निर्णय आहे.


अनुदान


आपण अनुदान पाहूया 30 * 30 * 3 मीटर शेततळ्यासाठी पन्नास हजार रुपये इतके कमाल अनुदान निश्चित करण्यात आले आहे. तर इतर शेततळ्यांसाठी आकारमानानुसार अनुदान दिले जाईल.

 या योजनेमध्ये जास्तीत जास्त पाच शेतकऱ्यांना गट करून सामाई कृत्या शेततळ्याची मागणी करता येईल या शेततळ्याचे आकारमान शासनाच्या नियमाप्रमाणे लागू असलेल्या आकारमानानुसार राहील तसेच मिळणारे अनुदान व पाण्याचा वापर पाण्याची हिस्से वारी याबाबत शेतकऱ्यांनी शंभर रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर करार करावा, आणि तो अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहील.


ज्या गावात मागील पाच वर्षात एक वर्षे तरी 50 पैशापेक्षा कमी पैसेवारी जाहीर केले आहे अशा गावांना प्राधान्याने पहिल्या टप्प्यात पन्नास हजार पेक्षा जास्त शेततळे देण्याची मान्यता देण्यात आली आहे .


दारिद्र्य रेषेखालील व्यक्ती बीपीएल व ज्या कुटुंबामध्ये आत्महत्या झाली आहे त्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये ज्येष्ठता यादी सूट देऊन प्रथम प्राधान्याने त्यांची निवड करण्यात येणार आहे.

तसेच शेततळ्याची मागणी करणाऱ्या अर्जदारास प्रथम प्राधान्य याप्रमाणे लाभार्थ्याची निवड करण्यात येणार आहे या योजनेअंतर्गत सात प्रकारच्या आकाराचे शेततळे निषेध करण्यात आली आहेत.


तळ्याची मागणी करण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे जिल्हा पातळीवर पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आढावा व समन्वय समिती या योजनेवर देखरेख करेल योजना अलमलबजावणी व समन्वयासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती असेल तालुका पातळीवर समिती शेततळ्याला मान्यता देईल.

शेततळी बांधण्यासाठी मशीन चा वापर करता येईल .शेततळ्याचे काम पूर्ण झाल्यावर अनुदानाची रक्कम लाभार्थ्याच्या खात्यात थेट जमा होणार आहे .


शेततळे योजनेच्या शासनाचे नियम व अटी 


1) महाराष्ट्र शासनाने या योजनेसाठी काही नियम व अटी ठेवण्यात आल्या आहेत त्या लाभार्थ्यांना बंधनकारक राहतील अटी व नियम खालील प्रमाणे आहेत.

2) या योजनेअंतर्गत कृषी विभागाचे सहाय्यक किंवा कृषी सेवक यांनी निश्चित केलेल्या ठिकाणी शेततळे बांधणे बंधनकारक राहील.

3) लाभार्थी शेतकऱ्यांनी स्वतःच राष्ट्रीय बँक किंवा इतर बँक मधील खत क्रमांक संबंधित कृषी सहाय्यक व कृषी सेवक यांच्याकडे पासबुकच्या झेरॉक्स सादर करावे.

4) शेततळ्याच्या कामासाठी कोणताही आगाऊ रक्कम मिळणार नाही .

5) शेततळ्याच्या बांधावर आणि पाण्याच्या प्रवाहाच्या भागांमध्ये स्थानिक प्रजातीची वनस्पतीची लागवड करावी.

6) शेततळ्याच्या दुरुस्तीची आणि निगा राखण्याची जबाबदारी संबंधित शेतकऱ्याचे राहील पावसाळ्यात शेत तळ्यात काळ वाहून येणार नाही यासाठी व्यवस्था शेतकऱ्यांनी स्वतः करावी आहे.

7) लाभार्थी शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद घेणे बंधनकारक राहील.

8) शासनाच्या नियमाप्रमाणे मंजूर शेततळे तयार करणे बंधनकारक राहील तसेच शेततळे पूर्ण झाल्यावर शेततळे योजनेचा बोर्ड लाभार्थ्यांनी स्वखर्चाने लावणे बंधनकारक आहे.

9) इनलेट आउटलेट सोय असावी आणि शेततळ्याच्या प्लास्टिक साठी स्वतः खर्च लाभार्थ्याने करायचा आहे.


या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे पहा 


या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना खालील कागदपत्रे सादर करावे लागते 

1)  जमिनीचा सातबारा उतारा 

2) जातीचे प्रमाणपत्र 

3) आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारसाचा दाखला 

4) दारिद्र्यरेषेखालील असलेला दाखला 

5) आधार कार्ड 

6) आठ अ प्रमाणपत्र 

7) स्वतःच्या स्वाक्षरी सहित भरलेला अर्ज 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासनाच्या  वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाईन अर्ज भरावा लागेल.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url