Drumstick Farming | आर्थिक दृष्ट्या फायदेशीर शेवगा लागवड संपूर्ण मार्गदर्शन
शेवगा शेती करत असताना कोणत्या प्रकारची जमीन निवडावी दोन झाडांमध्ये किती अंतर असावे. पाण्याचे नियोजन कसे करावे कोणते बियाणे निवडावे तर लागवड कधी आणि कशी करावी तसेच औषधाचे नियोजन खते आणि एकरी किती उत्पन्न भेटणार याची माहिती पाहूया
तर ही माहिती शेवटपर्यंत वाचा जेणेकरून शेवगा लागवड करताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी तुम्हाला समजून येईल .
शेवगा भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्वे असतात, कॅल्शियम जास्त असते आणि पाण्यात अँटिऑक्सिडंट असतात. ड्रमस्टिक्सची चव हिरव्या सोयाबीनसारखी असते परंतु थोडी गोड असते आणि शेवग्याच्या शेंगा हा बऱ्याच आजारा वरती गुणकारी असतात
शेवग्याची लागवड हे मध्य उष्णकटिबंधीय प्रदेशात केली जाते शेवग्याची झाडे वाढवण्यासाठी सोपी आणि सहज अशी उपलब्ध होतात शेवग्याच्या झाडा मध्ये कमी पाण्यावर पण येण्याची क्षमता असते तर शेवगा हे जलद वाढणारे बारमाही झाड आहे शेवग्याच्या पानाचा वापर जनावरांना खाद्य म्हणूनही केला जातो
शेवगा शेतीसाठी जमीन
शेवग्याची लागवड करण्यासाठी मध्ये मोहालकी जमिनीची गरज असते शेवगा लागवडीसाठी जमिनीची निवड करत असताना जमिनीमध्ये पावसाचे पाणी जास्त दिवस साचून राहू नये तर पाण्याचा निचरा व्हावा अशा प्रकारची जमीन निवडावी जमिनीतून पाण्याचा निचरा न झाल्यास झाडाची मुळे खराब होतात त्यामुळे पिकाचे नुकसान होते म्हणून शेवगा लागवडीसाठी जमिनीची योग्य निवड करणे अत्यंत महत्त्वाचे असते.
शेवग्याची रोपे कशी तयार करावी
शेवग्याचे बी बाजारातून आणल्यानंतर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये माती भरू पिशव्यांना खालच्या बाजूस छिद्र पाडून त्यात बिया घालाव्यात व त्यांना पाणी द्यावे एक महिना झाल्यानंतर अशा पिशव्या योग्य अंतरावर शेतात पुराव्यात.
शेवग्याच्या दोन झाडात तीन ते चार मीटर पर्यंत अंतर राखावे त्यामुळे एका हेक्टर मध्ये 400 ते 500 झाडे बसल्यास मदत होते झाडांची लागवड करत असताना दोन फूट खोल दोन फूट रुंद असे खड्डे खाणून घ्यावे व त्या खड्ड्यामध्ये शेणखत व इतर खते मिसळून मग पिशवी फाडून बी पुरलेली पिशवी लावावी आणि खड्ड्यामध्ये सर्व बाजूने समप्रमाणात माती भरून घ्यावी.
शेवगा पिकाची लागवड कधी करावी
शेवगा पिकाची लागवड पावसाळ्यात म्हणजेच सहाव्या किंवा सातव्या महिन्यात करतात काही जातींची लागवड वर्षभरात केली जाते. शेवग्याची झाडे दोन ते तीन मीटर वर कापल्यानंतर पुन्हा त्यांना फुटवे फुटून शेंगा येतात जेणेकरून तुम्ही शेंगा हाताच्या साह्याने तोडू शकता.
शेवग्याचे प्रकार किंवा वाण
बारमाही शेवगा
बारमाही शेवग्याची लागवड हे वर्षं वर्षे घरगुती शेंगा खाण्यासाठी केली जाते परंतु व्यवसायिक दृष्ट्या या शेवग्याला प्राधान्य दिले जात नाही कारण ते शेंगा लागण्यास किंवा वाढण्यात जास्त वेळ घेते अशा झाडांना जास्त पावसाचे गरज असते आणि कीटक किंवा रोगांना कमीप्रतिरोध असतो तर भारतामध्ये शेवगा झाड लागवडीचा हा प्रकार शेवग्याच्या कलमाद्वारे केला जातो.
जाफना शेवगा
ह्या जातीच्या एका झाडापासून आपल्याला एका वर्षासाठी दीडशे ते 200 शेंगा मिळतात याच्या शेंगा चवदार असल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत चांगली मागणी असते. या जातीच्या शेंगा 20 ते 30 सेंटीमीटर लांब असतात तसेच या जातीच्या झाडांना वर्षातून एकदा फुलोरा येतो आपणास वर्षाला एप्रिल मे मार्च या महिन्यात उत्पादन मिळते एका किलोमध्ये वीस ते पंचवीस शेंगा बसतात तसेच ही जात सर्वसामान्य अशा रोगांना बळी पडत नाही.
कोकणी रुचिरा
या वाहनाच्या शेंगा आकाराने किरकोणी गोल असतात तसेच या शेगांची लांबी दोन फूट पर्यंत असते या वाणाला वर्षाकाठी सरासरी 40 किलो पर्यंत शेंगा मिळू शकतात तर ह्या शेंगा बाजारात पण प्रसिद्ध असल्यामुळे मागणी मोठ्या प्रमाणात आहे.
पीकेएम- एक (PKM-1)
या जातीची झाडे जलद गतीने वाढतात या वाणाला येणाऱ्या शेंगा आरोग्यात सर्व बाकीच्या शेवग्यापेक्षा गुणकारी व प्रथिने युक्त असतात या वाणाच्या शेंगा दोन ते अडीच फूट लांबीच्या व रंगाने पोपटी असतात शेंगांना आतून भरपूर घर असतो त्यामुळे बाजारपेठेत या शेंगांची मागणी अधिक दिसते.
ओडिसी शेवगा
ओडिसी शेवग्याला वर्षातून दोन वेळा शेंगा येत असतात लागवडीनंतर चौथ्या महिन्यापासून झाडाला फुले येतात तर सहाव्या महिन्यातच शेंगा काढायला येतात या झाडांना शेंगाचे घोस येतात या शेंगांची स्वादिष्ट असते आणि शेंगातील गर सुद्धा जास्त असतो.
शेवगा शेतीसाठी पाणी व्यवस्थापन
शेवगा शेतीला जास्त पाण्याची गरज नसल्यामुळे शक्य असेल तर ठिबक सिंचनाने पाणी दिले जावे . ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिल्यास पाण्याची बचत होते आणि पिकाला गरजेपुरते पाणी मिळते सुरुवातीच्या काही दिवसात पाणी एक दिस अडाणी मिळाले तरी चालेल तर फुल अवस्थेत आल्यानंतर झाडांना पाण्याची जास्त गरज असते अशा अवस्थेत पाणी जास्त प्रमाणात द्यावे तर इतर वेळेस जास्त मनात पाणी देऊ नये.
शेवगा शेतीसाठी खत व्यवस्थापन
शेवगा लागवड करत असताना आपण खड्ड्यामध्ये शेणखत व इतर खाते देणारच आहोत त्याचबरोबर लागवडीनंतर तिसऱ्या ते चौथ्या महिन्यात प्रत्येक गावाला शंभर ते दीडशे ग्रॅम 10 26 26 व 18 18 10 किंवा इतर एनपीके खते द्यावेत तर खत हे झाडांच्या खोडापासून दोन फूट व्यासाने टाकून घ्यावे तर पुढच्या खताची मात्रा फुले आल्यानंतर द्यावी.
शेवगा पिकावर येणारे रोग व कीड नियंत्रण
शेवगा पिकावर सर्वसामान्यपणे फळमाशी सुरवंट पाने खाणारी अळी यासारख्या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो , तर मर, करपा हे रोग सुद्धा शेवग्यावर येत असतात.
फळ माशी
नावाप्रमाणे फळमाशीचा प्रभाव हा शेवग्याच्या शेंगावर दिसून येत असतो ही माशी शेंगावरच अंडी घालते व अंड्यातून अळ्या बाहेर पडून शेंगांमध्ये जातात व शेंगाच्या आतून गर खातात व शेंगा पोकळ पोकळ होता आणि शेंगा वाळून जातात.
फळमाशी नियंत्रण
फळमाशी पासून शेवग्याचे संरक्षण करण्यासाठी स्पिनोसॅड-४५ SC हे कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी. या कीटकनाशकाची मात्र एका लिटर पाण्यामध्ये ०.३- ०.४ मिली घेऊन दहा ते पंधरा दिवसाच्या अंतरातून फवारणी करावी.
पाने खाणारी अळी
पाणी खाणारे अळी मुख्य पणे पानाच्या खालच्या बाजूस जाळी करून राहत असते आणि झाडाची पाने व साल खाऊन झाडांना प्रकाश संश्लेषण क्रियेत अडथळा निर्माण करते. अशा आळीं पासून झाडाचे संरक्षण करण्यासाठी क्लोरोपायरीफॉस-५०% व सायपरमेथ्रीन-५% या कीटकनाशकांचे मिश्रण करून झाडांवर फवारणी करून घ्यावी.
करपा रोग
शेवग्यावर करपा रोग आल्यानंतर झाडावर किंवा झाडाच्या पानावर काळसर रंगाचे ठिपके दिसतात असे ठिपके मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर पाणी किंवा खोड खराब होऊन झाड किंवा पाणी गळून पडतात अशा रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब या कीटकनाशकाची किंवा कार्बेन-डिझीम २० लिटर पाण्यात २० मिली या प्रमाणात कीटकनाशकाची फवारणी करून घ्यावी.
मर रोग
मर रोग मुख्य पणे झाडाची पाने गाळून पाडतो व झाड पिवळे दिसू लागते काही दिवसानंतर झाड पूर्णपणे वाळूनही जाते मर रोगाच्या प्रसार हा मुख्यतः पाणी साचून राहणाऱ्या जमिनीमुळे होतो त्यामुळे शेवग्याची लागवड करत असताना पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडल्यास अशा रोगापासून आपल्या संरक्षण मिळते.
उपाय म्हणून कार्बेन-डिझिम या कीटकनाशकाची एक लिटर पाण्यामध्ये एक ते दीड ग्रॅम या मात्रेत फवारणी करून घ्यावी.रोगाचे प्रमाण जास्त असल्यास प्रत्येक आठवड्याला फवारणी घ्यावी.
योग्य प्रकारे शेवग्याची काळजी घेतल्यानंतर एका झाडाला 35 ते 40 किलो शेंगा भेटतात तर शेवग्यालाही बाजारपेठेत कायमस्वरूपी चांगली मागणी व रेट मिळत असल्यामुळे अशा पिकातून शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न भेटू शकते तर शेवगा शेतीत येणारा खर्च कमी व देखभाल दिस लागणारा मजूर ही कमी त्यामुळे शेतकऱ्यांना शेवगा पीक आर्थिक नफा मिळवून देणारे हमखास असे पीक आहे.
तसेच शेतकऱ्यांनी बाजारपेठेचा अभ्यास करून पीक घेतल्यास अधिक फायदा मिळवून येतो किंवा इतर फळभाज्याबरोबर शेताच्या बांधावर शेवग्याची लागवड केल्यास इतर वस्तूंच्या बाजाराबरोबरच शेवग्याच्या शेंगा ही तुम्हाला विकता येतात.
माहिती शेवट बद्दल वाचल्याबद्दल आपले हार्दिक आभार ही माहिती नक्कीच तुम्हाला आवडली असेल , व येणाऱ्या शेवगा पिकास ही उपयुक्त पडेल अशी आशा आहे. तर अशा नवनवीन शेती विषयक माहितीसाठी आमच्या ब्लॉगला पुन्हा आवश्यक भेट देत राहा.
धन्यवाद जय जवान जय किसान
![]() |
| BUY Tractor Guide |



