आजच अर्ज करा - ऊस तोडणी यंत्राच्या खरेदीसाठी सरकारकडून 40 टक्के अनुदान

Groups
Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now


नमस्कार शेतकरी मित्रांनो,

 महाराष्ट्र सर्वत्र उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. पण ऊस हंगामामध्ये ऊस कारखान्याला देण्यासाठी शेतकऱ्याला ऊस तोड मुकदम व टोळीच्या पाठीमागे खूप फिरावे लागते. व मोठ्या प्रमाणात पैसा द्यावा लागतो. 

उसाचे वाढलेले क्षेत्र न मिळणारे ऊसतोड मजूर त्यामुळे महाराष्ट्र शासना ने उसाची कापणी करणाऱ्या यंत्रासाठी 321 कोटी रुपये अनुदान देण्याची घोषणा केलेली आहे.

या अनुदानासाठी शेतकरी मित्रांबरोबर छोटे लघुउद्योजक , खाजगी व सहकारी साखर कारखाने व सहकारी शेती संस्था आणि शेतकरी उत्पादक संस्थांना ग्राह्य धरण्यात आलेले आहे.

हे पहा - 👇
 
दुधाच्या उत्पादनासाठी ह्या चारा पिकाची लागवड करा , दुधा बरोबर जमिनीची सुपीकता हि वाढेल

दोन लाखात ट्रॅक्टर आणा घरी स्वराज CODE टॅक्टर करतो शेतीतील सर्व कामे

औषध फवारणीसाठी योग्य ब्लोअर कसा निवडावा माहिती आणि मार्गदर्शन 


  • अनुदान किती रुपये मिळेल.


या योजनेमध्ये एका ऊस कापणी यंत्रासाठी कमीत कमी 35 लाख रुपये अनुदान देण्यात येईल व शेतकऱ्याला वरील 20% रक्कम स्वतः भांडवल म्हणून गुंतवावी लागेल.


  • महाराष्ट्र शासनाने खालील अटी या यंत्राच्या वापरासाठी घालण्यात आलेले आहेत.


1) या ऊस कापणी यंत्राचा वापर फक्त महाराष्ट्रापुरता करता येईल अशी अट या योजनेत गाठलेली आहे.

2) अनुदानावर घेतलेला यंत्राची कमीत कमी 6 वर्ष विक्री किंवा हस्तांतरण करण्यास बंदी असेल.

3) तोडणी यंत्र घेतल्यानंतर त्याचे बिल अपलोड करावे लागेल त्यानंतर प्रादेशिक साखर संचालक स्वतः गावात जाऊन यंत्राची प्रत्यक्ष पाहणी करतील, पाहणी अहवाल संकेतस्थळावर अपलोड झाल्यानंतरच अनुदान वितरणाची पुढील प्रक्रिया चालू करण्यात येईल.

4) शेतकरी किंवा संस्था कोणालाही यंत्र खरेदीच्या 40% किंवा 35 लाख रुपयापर्यंत अनुदान दिले जाईल व कोणत्याही शेतकऱ्याला त्याच्या कुटुंबातील एका किंवा शेती संस्था यांना एका यंत्रासाठी अनुदान मिळेल.

5) अर्जाची निवड ही लॉटरी पद्धतीने होणार असल्यामुळे वशिलेबाजी राहणार नाही , लॉटरीमध्ये आपले नाव आल्यानंतर तीन महिन्यात हे यंत्र खरीदे न केल्यास अर्ज रद्द ठरविण्यात येईल.


राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून 2023 - 24 या आर्थिक वर्षासाठी 900 तोडणी यंत्रांना अनुदान देण्याचे घोषित करण्यात आले आहे.


  • योजनेची अंमलबजावणी कोण करेल .

तोडणी यंत्राच्या अनुदान वितरणाचे नियोजन हे महाराष्ट्र शासनाने साखर आयुक्त यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. कारण कृषी खात्याचा साखर कारखान्याशी तसा फारसा संबंध नसतो, त्यामुळे ही योजना साखर आयुक्तालयाकडे सोपविण्यात आले आहे. 

परंतु या योजनेच्या अंमलबजावणीसाठी साखर आयुक्ताच्या अध्यक्ष खाली समितीत कृषी विभागाच्या प्रक्रिया संचालकाला स्थान देण्यात आलेले आहे.


  • अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करावा .


या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी Mahadbt ला लॉग इन करून ,स्वतःच्या मोबाईलवरून किंवा CSC केंद्रातून अर्ज दाखल करू शकतो.

संकेतस्थळावर ऑनलाईन नाव नोंदणी व प्रोफाइल तयार करावे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संकेतस्थळावर सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरावे , अर्ज भरल्यानंतर 23 रुपये 60 पैसे ऑनलाइन शुल्कही भरावे लागेल .


काही दिवसांनी अर्जाची सोडत काढली जाईल व या लॉटरी पद्धतीत आपले नाव आल्यानंतर आपणाकडून यंत्राचे दर पत्र मागविले जाईल. व ते तपासून पूर्वसंमती मिळाल्यानंतर तोडणी यंत्राची खरेदी 90 दिवसाच्या आत शेतकरी किंवा संबंधित संस्थेला करावी लागेल.


एकदा का तुम्ही खरेदी केली नंतर देयक पत्रक वेबसाईटवर जाऊन अपलोड करावे व यंत्राची तपासणी साखर आयुक्तांकडून झाल्यानंतर अनुदान बँक खात्यात लवकरात लवकर जमा होईल.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url