१७०० कोटी मंजूर | नमो शेतकरी महासन्मान निधी योजना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार दोन हजार रुपये
आज आपण नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ला राज्य सरकारची मंजुरी देण्यात आलेली आहे त्याबद्दल सविस्तराची माहिती घेणार आहोत.
योजनेच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वीच म्हणजेच दिवाळीचा बोनस म्हणून दोन हजार रुपये लवकरात लवकर जमा करणार आहे.
ही सर्व शेतकऱ्यांना खुश करणारी खबर राज्य शासनाने मंगळवार दिनांक 11 ऑक्टोंबर 2023 रोजी देण्यात आलेली आहे.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाने ही योजना जाहीर केलेली आहे या योजनेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहेत या योजनेतील दोन हजार रुपये चा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.
माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 चा अर्थसंकल्पीय भाषणात नमो शेतकरी महा सन्माननिधी योजना घोषित केली होती.
केंद्र सरकारच्या किसान सन्मान निधी योजना अंतर्गत प्रतिवर्षी शेतकऱ्याला सहा हजार रुपये अनुदान मिळते त्याचबरोबर महाराष्ट्र शासन व राज्य शासन च्या माध्यमातून या दोन योजनेमधून शेतकऱ्यांना आता प्रतिवर्षी 12 हजार रुपयाची मदत किंवा अनुदान मिळणार आहे. योजना राबवण्यास जून 2023 मध्ये मान्यता देण्यात आलेली होती.
पी एम किसान सन्मान योजनेचा पंधरावा हप्ता ही लवकर
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा ही पंधरावा हप्ता लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये दिवाळीपूर्वी जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.
त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना राज्य शासनातर्फे देण्यात येणारे दोन आणि केंद्र सरकार तर्फे देण्यात येणारे दोन असे चार हजार रुपये मिळतील.
अनुदानाचे वितरण कसे होणार
शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी महासन्मान या योजनेचे अनुदान प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या खात्यामध्ये केले जाणार आहे जसे पीएम किसान योजनेचे पैसे खात्यात मिळतात त्यात माध्यमाचा उपयोग करून सरकार महाडीबीटी पोर्टलवर काम केलेले आहे.
आणि याच माध्यमातून सर्व शेतकऱ्यांच्या खातामध्ये लवकरात लवकर पैसे जमा केले जाणार आहेत अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले आहे. तर लवकरात लवकर सर्व शेतकरी मित्रांनी आपल्या खात्याची केवायसी करून घ्यायचे आहे जेणेकरून पैसे जमा होताना कोणतेही अडचण होणार नाही.
नमो शेतकरी महा सन्मान योजनेसाठी महाराष्ट्रातील एक कोटी 18 लाख 71 हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली होती. तर यापैकी 94 लाख 20 हजार 815 शेतकरी या योजनेमध्ये लाभार्थी ठरवण्यात आलेले आहे.
या सर्व शेतकरी मित्रांना दिवाळीपूर्वी 1720 कोटी हा मंजूर झालेला निधी दोन हजार रुपये पर शेतकरी याप्रमाणे डीबीटी च्या माध्यमातून वितरित करण्यात येणार आहे.
