रिस्क न घेता या योजनेच्या माध्यमातून करा दुप्पट पैसे | How to grow money without risk ?
आज आपण रिस्क न घेता आजकालच्या जगात पैसे कसे दुप्पट करता येतील याविषयी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत.
तुम्हाला वाटेल की आम्ही कोणत्या जुगाराविषयी तर बोलत नाही ना पण तसे काही नाही आज तुम्हाला आपल्या देशात उपलब्ध असणाऱ्या अशा काही सरकारी स्कीम सांगणार आहोत ज्याच्या माध्यमातून आपण आपले पैसे न रिस्क घेता दुप्पट करू शकता किंवा अधिक चांगल्या व्याजदर मिळवू शकता यासाठी आपणास शेअर मार्केट मधील जोखीम पण घ्यायची गरज राहणार नाही.
या योजनेचा लाभ महिला शेतकरी ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य लोकांना होतो या योजना नक्की कोणत्या आहेत ते आपण खाली पाहूया.
1) राष्ट्रीय बचत मासिक उत्पन्न योजना
भारतीय पोस्ट ऑफिसच्या या योजनेच्या नावाप्रमाणेच आपल्याला प्रत्येक महिन्याला व्याज स्वरूपात उत्पन्न मिळते.पूर्वी या योजनेमध्ये जास्तीत जास्त चार लाख रुपये गुंतवणता येत होते पण योजनेची लोकप्रियता लक्षात घेता सरकारने आत्ता या योजनेमध्ये जास्तीत जास्त नऊ लाख रुपये गुंतवणुकीची रक्कम ठरविण्यात आली आहे.
भारत सरकारच्या 2023 च्या बजेटनुसार या योजनेमध्ये जॉईंट अकाउंट ओपन केल्यास आपण जास्तीत जास्त पंधरा लाख रुपये ठेवू शकता. ही योजना चालू करण्यासाठी आपण शंभर रुपये भरून जवळच्या पोस्टात जाऊन अकाउंट चालू करू शकता. योजनेचा कालावधी पाच वर्ष असून यामध्ये ७.४ % वार्षिक या दराने व्याज मिळते.
जर तुम्हाला एक मोठी रक्कम जास्त जोखीम न घेता गुंतवणूक करून दर महिना पैसे कमवायचे असतील तर पोस्ट ऑफिस ची राष्ट्रीय बचत मासिक योजना तुमच्या उत्पन्नाचा नवीन एक स्त्रोत बनवू शकतो, तसेच ही योजना पोस्ट ऑफिसची असल्यामुळे पैसेही सुरक्षित राहतात योजनेचा कालावधी पाच वर्षाचा आहे. तर आपण पाच वर्षे झाल्यानंतर पुन्हा पाच वर्षासाठी योजना घेऊ शकतो.
पीएम किसान योजना 14 वा हप्ता मिळणार पहा संपूर्ण माहिती
2) सुकन्या समृद्धी योजना
सुकन्या समृद्धी योजनेची सुरुवात 22 जानेवारी 2015 रोजी भारत सरकारने मुलीच्या साठी खास केली आहे. या योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये व जास्तीत जास्त दीड लाख रुपये गुंतवणूक करता येते.मुलीच्या जन्मानंतर ती दहा वर्षाची होईपर्यंत कधीही पोस्ट ऑफिस किंवा वित्तीय संस्थेमध्ये जाऊन खाते उघडता येते तर मुलगी १८ वर्षाची होईपर्यंत कायदेशीर पालक किंवा पालकाद्वारे पैसे जमा केले जाऊ शकतात.
या योजनेचा कालावधी २१ वर्षाचा असून भारत सरकार दर तीन महिन्यांनी या योजनेसाठी व्याजदर जाहीर करत असते. तसेच या योजनेमधून इन्कम टॅक्स कायदा 1961 च्या कलम 80 अंतर्गत सूट ही मिळते. या योजनेमधून तुम्ही तुमच्या मुलीच्या उच्च शिक्षणासाठी पैसे किंवा विवाहासाठी पैसे काढू शकता, पण यासाठी खातेदाराचे वय १८ वर्षे असणे आवश्यक आहे, आणि तिने दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करणे आवश्यक असते.
सध्या ह्या योजनेवर वार्षिक आठ टक्के इतके व्याज मिळत आहे, त्यामुळे तुम्हाला मुलगी असल्यास त्वरित जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तिचे भविष्य सुरक्षित करा.
3) किसान विकास पत्र
भारत सरकारने शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून किसान विकास पत्र ही योजना चालू करण्यात आली आहे. या योजनेत वार्षिक ७.५% या व्याजदराने व्याज मिळते. तसेच सामान्य जनता सुद्धा योजनेत सहभागी होऊ शकते. या योजनेचा कालावधी ९ वर्ष ५ महिने आहे. कमीत कमी एक हजार रुपये आणि जास्तीत जास्त असे कितीही रक्कम या योजनेत जमा करता येते. या योजनेमध्ये आपण वैयक्तिक खाते किंवा संयुक्त खाते सुद्धा काढू शकता.
पात्रता :
खातेधारक भारतीय नागरिक असावा.
खातेदारकाचे वय 18 पेक्षा जास्त असावे.
या योजनेच्या माध्यमातून आपणास जमा केलेल्या रकमेवर कर्जही घेता येते, तर घेण्यात येणाऱ्या रकमेवर व्याजदरही अल्प प्रमाणात असतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये संपर्क करू शकता.
4) राष्ट्रीय बचत टाईम डिपॉझिट :
या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन खाते उघडू शकता या योजनेमध्ये एक दोन तीन आणि पाच वर्षासाठी गुंतवणूक करता येते या योजनेमध्ये ७.५ % पर्यंत वार्षिक व्याज मिळते.
या योजनेमध्ये कमीत कमी १००० किंवा जास्तीत जास्त कितीही रक्कम जमा करता येते जर तुम्ही वार्षिक ५०००० पेक्षा जास्त रक्कम जमा करत असल्यास खातेदारकाला पॅन नंबर पोस्ट ऑफिस मध्ये जमा करावा लागतो. या योजनेच्या माध्यमातून इन्कम टॅक्स ८० क अंतर्गत सूट ही मिळते.
शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या आर्थिक योजना
5) महिला सन्मान बचत प्रमाणपत्र
ही योजना भारत सरकारने महिलांच्या सन्मान करण्यासाठी चालू करण्यात आली आहे या योजनेमध्ये कमीत कमी हजार रुपये किंवा जागतिक जास्त दोन लाख रुपये गुंतवणूक करता येते तर यावर वार्षिक ७.५ % इतके व्याज मिळते.
या योजने मध्ये तिमाही चक्रवाढ पद्धतीने व्याज जमा होते व दोन वर्षाचा कालावधी संपल्यानंतर जमा मुद्दल व व्याज असे खातेदारकाला दिले जाते. योजनेचा लाभ घेण्यासाठी आपण जवळच्या पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन अधिक माहिती घेऊ शकता.
नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत आहात ? खरेदी करण्यापूर्वी वाचा
6) पीपीएफ:
या योजनेचा कालावधी पंधरा वर्षे असून खातेदारकाला ७.१ % वार्षिक व्याज मिळते, या योजनेमध्ये भारताचा कोणताही नागरिक ५०० ते महिना १.५ लाख रुपये पर्यंत रक्कम जमा करू शकतात. हे खाते उघडण्यासाठी आपण जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेमध्ये संपर्क करू शकता.
या योजनेचा कालावधी पंधरा वर्षे असून पंधरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपण पाच पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अनिश्चित वेळेसाठी योजना चा कालावधी वाढवून फायदा घेऊ शकता. तसेच या योजनेमध्ये 80 क च्या अंतर्गत इन्कम टॅक्स वर ही सूट भेटते.
