नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल.



नमस्कार शेतकरी मित्रांनो, 

आज आपण नमो शेतकरी महासन्माननिधी या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा पहिला हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार यासंदर्भात सविस्तर अशी माहिती घेणार आहोत.  महाराष्ट्र शासनाने योजनेची घोषणा करून बरेच दिवस झाले परंतु अजून हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना हा प्रश्न पडला आहे की या योजनेचा पहिला हप्ता कधी जमा होणार ?

Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now

माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  पीएम किसान निधी योजनेचा चौदावा हप्ता देशभरातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये २८ जुलै ला जमा केला आहे. त्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा हप्ता केव्हा जमा होईल याची सर्वत्र चर्चा करताना दिसत आहेत.


  • प्रथम या योजनेची माहिती आणि लाभ जाणून घेऊया.

        योजनेचे नाव:  महाराष्ट्र नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना

        योजनेचे  वर्ष:  २०२३

        लाभार्थी:  महाराष्ट्रातील शेतकरी

अर्ज करण्याची आवश्यकता नाही, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य  मिळवणारा प्रत्येक शेतकरी नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत आपोआप पात्र ठरतो.

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या पीएम किसान सन्मान निधी योजने सारखीच एक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकरी कुटुंबाला महाराष्ट्र सरकारकडून वर्षाला ६००० रुपयांची मदत दिली जाणार आहे. ही आर्थिक रक्कम थेट लाभार्थीच्या बँक खात्यावर पाठवली जाईल. 

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आता वर्षाला १२००० रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. यातील ५०% महाराष्ट्र सरकार आणि बाकी ५०% केंद्र सरकार देईल. म्हणजेच या दोन्ही योजनांद्वारे राज्यातील शेतकऱ्यांना दरमहा एक हजार रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे. 

Read:  मागेल त्याला शेततळे योजना 2023 संपूर्ण माहिती 

नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा लाभ पात्र शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दिला जाईल.दर तीन महिन्यांनी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2000 रुपये जमा होतील. महाराष्ट्र शासन या योजनेसाठी दरवर्षी सहा हजार नऊशे कोटी रुपये खर्च करणार आहे व या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील दीड कोटी शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदतीचा लाभ मिळणार आहे.

Read:  नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत आहात ? खरेदी करण्यापूर्वी वाचा

याव्यतिरिक्त महाराष्ट्र शासन एक रुपयांमध्ये पिक विमा योजनेचा हप्ताही स्वतः शेतकऱ्यांसाठी भरणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक संकट  येणार नाही. एक रुपये मध्ये पिक विमा किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमातून सरकार सर्वसामान्य शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे, त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे जीवनमान सुलभ होण्यास मदत होईल.  


  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी पात्रता काय असेल ? 

        1) शेतकरी अर्जदार हा मूळचा महाराष्ट्राचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.

        2) शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी.

        3) अर्जदार शेतकऱ्याने महाराष्ट्राच्या कृषी विभागाकडे नोंदणी केलेली असणे आवश्यक आहे.

        4) आणि सगळ्यात महत्त्वाचे अर्जदाराचे बँक खाते असावे व ते आधार कार्डची जोडलेले असावे.


  • नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे कसे आणि कधी भेटणार.

    महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे पुढील टप्प्यात मिळणार आहेत.

        पहिला हप्ता - एप्रिल ते जुलै

        दुसरा हप्ता - ऑगस्ट ते नोव्हेंबर

        तिसरा हप्ता - डिसेंबर ते मार्च


तर सध्या सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी ४,००० कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. याचा लाभ महाराष्ट्रातील ८७ लाख पेक्षा जास् तशेतकऱ्यांना भेटणार असे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेले आहे.  माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे म्हटले आहे की राज्य सरकार ने योजनेची सर्व आवश्यक तरतुदी पूर्ण केलेले आहेत.व पुढच्या महिन्याभरात राज्यातील शेतकऱ्यांना केंद्र शासन प्रमाणेच राज्य सरकार देखील डीबीटी च्या माध्यमातून योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करेल.

लवकरात लवकर पुढील महिन्यात हप्ता जमा होईल याची काळजी सरकार  घेणार आहे, त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी आपली माहिती कृषी विभागाकडे सुपूर्द केलेली नाही अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कागदपत्राची पूर्तता करून योजनेचा लाभ घ्यावा.  

योजनेचा जीआर डाऊनलोड करा 







Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url