दुधाच्या उत्पादनासाठी ह्या चारा पिकाची लागवड करा , दुधा बरोबर जमिनीची सुपीकता हि वाढेल

Groups
Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now

 



नमस्कार शेतकरी मित्रांनो ,

आज आपण दूध उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी जनावरांना कोणता चारा दिला पाहिजे व हा  चारा जनावरांच्या आरोग्यासाठी  कसा फायदेशीर ठरेल.  याविषयी सविस्तर अशी माहिती घेणार आहोत.

 

शेतकरी मित्र पूर्वीपासून पशुपालन हा व्यवसाय करत आलेला आहे आणि जवळजवळ 80 ते 90 टक्के शेतकऱ्याचे दैनंदिन खर्च हा दूध व्यवसायावर अवलंबून असतो. त्यामुळे ह्या व्यवसायाकडे जनावरांच्या आरोग्याची कडे लक्ष देणे खूप महत्त्वाचे असते. कारण जनावरे हे शेतकऱ्यांसाठी खूप मोठे भांडवल असते.


त्यामुळे जनावरांना चारा देत असताना फक्त दूध उत्पादनाचा विचार करून चालत नाही, दुधाच्या वाढीव उत्पादनाबरोबरच अशा चाऱ्याने जनावरांची आरोग्य ही व्यवस्थित राहणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून संतुलित चारा खायला देणे खूप गरजेचे असून त्याकरता जनावरांच्या दैनंदिन आहारामध्ये ऊर्जा कर्बोदके प्रथिने  आणि क्षार इत्यादी घटकाचा समतोल समावेश असणे ही गरजेचं आहे.

 

जनावरांना प्रतिनिधी प्रथिनांचा पुरवठा खूप महत्त्वाचा असो तो सरकी पेंड किंवा इतर माध्यमातून दिला जाऊ शकतो. परंतु सरकी पेंड किंवा सुगराची बाजारात किंमत खूपच जास्त आहे. त्यामुळे दुधातून मिळणाऱ्या नफ्यावर फरक पडतो. याच दृष्टिकोनातून शेतकरी नेहमी विविध चारा पिके चा शोध घेत असतो. जेणेकरून चाऱ्यावर येणारा खर्च कमी येईल व दुधापासून मिळणारे उत्पादन वाढेल.


हे पहा : शेतातील तणांचा नायनाट करण्यासाठी रामबाण यंत्र शेतकऱ्यांना ठरेल वरदान, वाचा सविस्तर माहिती आणि किंमत

हे पहा :  टोमॅटो लागवड संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन | Tomato Farming 


चारा म्हणून चवळीचा उपयोग

चवळी हे द्विदल वर्गामध्ये मोडणारे  पीक आहे.  तर या पिकाच्या मुळावर रायझोबियम जिवाणूंच्या गाठी असतात. हे पीक हवेतील नत्र शोषण घेऊन जमिनीमध्ये त्याची साठवण करते. चवळीमधील नत्र स्थिरणी करण्याचा प्रमाणाचा विचार केला तर साधारणपणे हेक्‍टरी 25 ते 30 किलो पर्यंत असते.

 

त्यामुळे अशा पिकाच्या लागवडीतून जमिनीची सुपीकता पोच सुधारण्यास मदत होते. जमिनीतील नत्र देखील वाढते. तसेच लागवड केल्यानंतर या पिकाची वाढ ही लवकर होत आहे.


यामध्ये कॅल्शियम चे प्रमाण देखील चांगले असते त्यामुळे जनावरांना वरून दुसरे कॅल्शियम द्यायची गरज पडत नाही. तर या पिकाच्या माध्यमातून जनावरांना कॅल्शियम नैसर्गिक रित्या मिळू शकते. 


तसेच चवळीमध्ये स्फुरद व नत्र असल्यामुळे याचा जनावरांना खूप मोठा फायदा होतो. तर चवळीमध्ये प्रथिनांचे प्रमाण 18 ते 20% असल्यामुळे शेतकऱ्याला जनावरांसाठी वेगळी पेंड किंवा इतर बाजारातील खाद्याची गरज पडत नाही.

 

चवळी पिकाची लागवड व हंगाम 

चवळी पिकाची लागवड खरीप हंगामात केली जाऊ शकते. तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असल्यास जूनमध्ये किंवा पाऊस झाल्यानंतर ऑगस्ट  महिन्यामध्ये पेरणी केली जाऊ शकते. पेरणी करत असताना दोन ओळींमधील अंतर 10 सेंटीमीटर ठेवणे गरजेचे असते.


पेरणी करण्या अगोदर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करून घ्यावी. चारा पीक म्हणून चवळीचे उत्पन्न घ्यायचे असेल तर प्रतिहेक्टरी सर्वसाधारण 40 किलो बियाणे लागते. तर चाऱ्यासाठी कापणी करायचे असेल तर चवळी पन्नास टक्के फुलोऱ्यात असताना केली तर खूपच पौष्टिक चारा मिळतो.


सर्वसाधारणपणे पेरणी केल्यानंतर 50 ते 60 दिवसांनी या पिकाची काढणी केली जाऊ शकते. तर तसेच चांगले लक्ष देऊन व्यवस्थापन केले असल्यास एका हेक्टर मधून सर्वसाधारणपणे 400 किलो चवळीच्या हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळू शकते.


चवळी बरोबर शेतकरी मित्र विविध पौष्टिक चारा आपल्या शेतामध्ये घेऊन दुधाच्या उत्पादनात वाढ करून आर्थिक नफा मिळवू शकतात. सध्याच्या काळात शेतकरी दुधापासून चांगला नफा मिळवत आहेत , पण दुधातील नफा गाई व जनावरांच्या खाद्यावर जास्त प्रमाणात किमती वाढल्यामुळे जात आहे.  


तरी शेतकऱ्यांनी अशा खाद्य न घेता स्वतःच्या शेतीत कोणती पिके घेऊन दूध उत्पादन वाढ होईल यावर लक्ष दिले पाहिजे.


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url