दोन लाखात ट्रॅक्टर आणा घरी स्वराज CODE टॅक्टर करतो शेतीतील सर्व कामे
नमस्कार शेतकरी
मित्रांनो
आपल्या सर्व
शेतकरी मित्रांना ट्रॅक्टर घेणे शक्य नसते एक तर क्षेत्र कमी असते आणि ट्रॅक्टरच्या
किमती फार आहेत तर आज आपण स्वराज कंपनीच्या मिनी ट्रॅक्टरची सर्व माहिती घेणार आहोत. या ट्रॅक्टरच्या माध्यमातून आपण आपल्या शेतातील सर्व प्रकारची कामे करू शकाल आणि याची
किंमत ही सर्वसामान्य परवडेल अशी आहे.
हा ट्रॅक्टर दिसायला बाईक सारखा दिसतो पण याचे जे फीचर्स आहेत. किंवा ज्या सुविधा आहेत त्या सर्व ट्रॅक्टर सारख्याच आहेत. कोणीही या ट्रॅक्टरला प्रथम पाहताच आश्चर्यचकित होईल की हा ट्रॅक्टर कशी काय शेतातली कामे करू शकेल ?
हा ट्रॅक्टर चालवण्यासाठी आपल्याला लायसन
किंवा आरटीओ रजिस्ट्रेशन जे ही गरज भासणार नाही. हा ट्रॅक्टर स्वराज कंपनीने बाजारात
आणला असून याचे नाव स्वराज कोड ट्रॅक्टर असे आहे.
Read : औषध फवारणीसाठी योग्य ब्लोअर कसा निवडावा माहिती आणि मार्गदर्शन
ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
हा ट्रॅक्टर स्वराज कंपनीने बाजारात आणला असून याचे नाव स्वराज कोड ट्रॅक्टर असे आहे स्वराज कंपनी ने ह्याला एस ट्रॅक्टर असेही नाव दिले आहे. कारण हा शेतातील कोणतीही कामे करण्यास समर्थ आहे.
हे मशीन पावर ट्रेलर आणि मिनी ट्रॅक्टरच्या मधल्या अशी मशीन आहे की ज्याचा वापर
करून आपण शेतातील सर्व कामे करू शकतो.
विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर पेट्रोल वर चालतो. आणि हा ट्रॅक्टर चालण्यासाठी खर्चही खूपच कमी येतो.
ह्या ट्रॅक्टरच्या उपयोगाने आपण कमी
जागेत किंवा छोट्या पिकात विविध अशी कामे करू शकता . हा ट्रॅक्टर्स स्वराज्य शोरूम
मध्ये देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये भेटत आहे
Engine
ह्या ट्रॅक्टर
मध्ये होंडा कंपनीचे GX 390 फोर स्ट्रोक इंजिन लावण्यात आले आहे. जे सिंगल सिलेंडरवर
चालते. तर या पासून 11.1 होउर्से पॉवर आणि क्युबिक क्षमता
390 आहे.
इतर माहिती
1) Break oiled 2) PTO 1000 RPM
3) वजन उचलण्याची
क्षमता - 230 kg
4) ट्रॅक्टरचे वजन - 450kg. 5) लांबी 1180 mm 6) रुंदी 890 mm
7) Wheel Base - 1463 mm 8) Ground clearance 266 mm
9) Front tyres 4/9 10) Rear tyres 6 /14
आता पाहूया हा ट्रॅक्टर शेतातील कोणती कामे करू शकतो.
ह्या ट्रॅक्टरचा वापर रानातील शेतीची मशागत, औषध फवारणी तसेच दोन सऱ्यांच्या मधून मशागत करून तणावर नियंत्रण करता येत व कटर च्या साह्याने पिकाची काढणी ही करता येते.
ह्या ट्रॅक्टरच्या मदतीने आपण Rotavator , Cultivator , स्प्रे पंप आणि Reeper साधनांचा उपयोग करून शेती अत्याधुनिक पद्धतीने करू शकता.
ह्या ट्रॅक्टरची किंमत एक लाख 75 हजार ते दोन लाख रुपये पर्यंत आहे.
अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या. 👇
---------------------Swaraj Tractors-----------------------------
