सावधान ! खत खरेदी करताना फसवणूक तर होत नाही ना ? आजच घरबसल्या खताच्या किमती पहा

Groups
Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now



 नमस्कार शेतकरी मित्रांनो,

पावसाचे उशिरा झालेल्या आगमन आणि त्यामुळे उशिरा झालेल्या पेरण्या त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांना आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. 

त्यातच शेतकऱ्याची प्रत्येक ठिकाणी फसवणूक होताना दिसत आहे. सरकारने एक रुपयात विमा दिला पण शेतकऱ्यांना विमा उतरवून घेत असताना बऱ्याच सीएससी केंद्राकडून जास्त पैशाची मागणी करण्यात आलेली आहे.

वाचा - नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत आहात ? खरेदी करण्यापूर्वी वाचा 

वाचा - कापूस - कीड व्यवस्थापन - मार्गदर्शन 

पेरणी करून आता दोन-तीन महिने झाल्यामुळे पिकाला खते व औषधाची गरज आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याची अगोदरच बियाण्यामध्ये काही ठिकाणी फसवणूक झालेले आहे. तर खत घेत असताना खत विक्रेत्याकडून खताची वाजवी किंमत ही घेतली जाते. 

त्याचाच विचार करून सरकारने आता किसान सुविधा ही वेबसाईट सुरू केलेली आहे जेणेकरून शेतकरी घर बसल्या आपल्या मोबाईल वरून शेतकरी स्वतः आपल्या जिल्ह्यानुसार खताच्या किमती पाहू शकतील.


  • खताच्या किमती ऑनलाईन कशा चेक  कराल .

1) प्रथम Kisan Suvidaया वेबसाईटला भेट करा.

2)आपले राज्य व कोणते खताची किंमत पाहिजे आहे ते सिलेक्ट करा 

3) त्यानंतर सबमिट या चिन्हावर क्लिक करा त्यानंतर आपल्याला आपल्या राज्या नुसार सर्व खताच्या कंपन्या व त्यांच्या किमती दिसून येतील.  

वाचा - नवीन ट्रॅक्टर घेण्याचा विचार करत आहात ? खरेदी करण्यापूर्वी वाचा 


  • किसान सुविधा या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही खालील सुविधा  पण घेऊ शकाल.

या वेबसाईटच्या माध्यमातून तुम्ही आपल्या जिल्ह्यातील खत विक्रेता व त्यांची संपर्क करण्यासाठी लागणारी सर्व माहिती जसे की मोबाईल नंबर पत्ता व एजन्सी चे नाव गावानुसार पाहू शकाल.

तसेच आपल्या जिल्ह्यातील प्रत्येक विक्रेत्याकडे कोणत्या खताचा किती साठा आहे याचीही तपशीलवार माहिती या वेबसाईटवर मिळेल.


आशा करतो की वर सर्व दिलेली माहिती आपणास आवडली असेल , शेतकरी मित्रांनो आजच्या डिजिटलच्या युगात कोणत्याही माध्यमातून कधीही कोणाचीही फसवणूक होऊ शकते. 

त्यामुळे शेतकरी मित्रांनी कोण तरी आपल्याला वाचवायला येईल किंवा कुणाकडे जाऊन माहिती घेण्यापेक्षा स्वतः इंटरनेटच्या मदतीने अशी माहिती घ्यावी. व इंटरनेटच्या युगात साक्षर व्हावे जेणेकरून आपली होणारी फसवणूक थांबवता येईल व शेतकऱ्यांची प्रगती होईल.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url