घर बसल्या पहा आपणास किती रेशन मिळते. रेशन दुकानदार आपली फसवणूक तर करत नाही ना ? इते तक्रार करा
आज आपण रेशन दुकानात सामान्य लोकांचे होणारी फसवणूक याविषयी चर्चा करणार आहोत.
अनेक लोकांना प्रत्येक महिन्याच्या रेशन मध्ये कोणत्या ना कोणत्या कारणास्तव फसवणुकीला सामोर जावं लागतं. एक तर रेशन दुकान कधी वेळेत चालू किंवा बंद होत नसते. बऱ्याच लोकांना काही महिन्याचा रेशन चा माल मिळतो तर काही महिन्याचा रेशन चा माल आलाच नाही म्हणून दिला जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होतो.
रेशन दुकानदार अशा लोकांचा रेशन चा माल काळ्या बाजाराने विकून भ्रष्टाचार करतात. सर्वसामान्य लोक असल्यामुळे ते कुणाकडे तक्रार करत नाहीत. किंवा त्यांना कुठे तक्रार करावी हे पण माहित नसते.
वाचा: कडू सत्य: साखरेचा मानसिक आरोग्यावर कसा परिणाम होतो.
सरकार सामान्य लोकांची जीवनशैली उंचावण्यासाठी कोरोना पासून रेशन मोफत देत आहे, पण रेशन दुकानदार सामान्य लोकांना तुमचे रेशन आलेच नाही म्हणून देत नाही. कुठे तक्रार करावी तर सुशिक्षित तरुण वर्ग प्रशासकीय सेवेत दाखल झाला आहे पण तो ही भ्रष्टाचारामध्ये गुंतलेला दिसत आहे.
अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्यांनी तक्रार तर कोणाकडे करावे ? तर आपण आज रेशन सरकारकडून तुमच्या कुटुंबाला किती मिळते हे ऑनलाईन रित्या कसे पाहायचे ते पाहणार आहोत.
- असे पहा तुमच्या कुटुंबाला किती रेशन मिळते.
- सर्वात प्रथम गुगल ब्राउझर मध्ये महाफुड डॉट कॉम या संकेतस्थळाला भेट द्यावी.
- ऑनलाईन शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणाली वर क्लिक करा म्हणजे अजून एक वेबसाईटओपन होईल
- हि नवीन वेबसाईट ओपन झाल्या नंतर online sales वर क्लिक करा.
4. ऑनलाइन सेल्स वर क्लिक केल्यानंतर अजून एक वेबसाईट ओपन होईल. त्यानंतर आपण ज्या महिन्याचे धान्य तपशील पाहायचे आहे. तो महिना निवडावा , वर्ष निवडावे व RC नंबर टाकून सबमिट बटन वर क्लिक करावे.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्ड ची तपशील , घरातील किती मेंबर रेशन कार्ड वर आहेत. त्याची माहिती आणि त्याचबरोबर धान्य कोणकोणते व किती भेटते याची सर्व माहिती मिळेल.
अशा प्रकारे आपण आपल्या रेशन कार्ड चा संपूर्ण तपशील पाहू शकाल. तक्रार करण्यासाठी आपण खालील website ला भेट द्या.


