सावधान ! तुमच्या आधार कार्डचा गैरवापर तर होत नाही ना ? घरबसल्या आपल्या मोबाईल वरून चेक करा | Misuse of Aadhaar

Groups
Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now




 नमस्कार शेतकरी मित्रांनो ,


कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत असताना शेतकरी मित्रांना आधार कार्ड सर्वत्र द्यावे लागते त्यामुळेच आधार कार्डचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असते.


कोणतेही व्यक्ती आपल्या आधार कार्डचा वापर करून इतर शासकीय योजना चा लाभ किंवा आधार कार्डचा वापर इतर अपराधिक गोष्टी करण्यासाठी वापरू शकतो त्यामुळे आपल्या आधार कार्डचा कोण गैरवापर करत आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरते .

हे वाच : ऊस पिकावर येणारे रोग आणि त्यांचे व्यवस्थापन

बरेच शेतकरी मित्र डिजिटल उपकरणाचा वापर खूप कमी प्रमाणात करत असतात त्यामुळे त्यांना मोबाईल हाताळणे किंवा अशा गोष्टी इंटरनेटवर चेक करणे खूप अवघड जाते. त्यामुळे आम्ही खाली दिलेली माहिती वाचून आपण आधार कार्डचा गैरवापर होत आहे की नाही हे पाहू शकता.


आधार कार्ड हे एक महत्त्वाचे शासकीय डॉक्युमेंट झालेले आहे. आणि आधार कार्ड झेरॉक्स आपण सर्वत्रच वापर करत असतो त्यामुळे आपल्या आधार कार्डचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असते.

पण आता आपण घरबसल्या आपले आधार कार्ड चा वापर कुठे कुठे होत आहे हे पाहू शकता , आणि जर एखादी व्यक्ती आपल्या आधार कार्डचा गैरवापर करत असेल. तर आपण त्याच्या विरुद्ध तक्रार ही करू शकतात.  


  • आपण खालील दोन पद्धतीने आधार कार्ड चा गैरवापर होत असेल तर चेक करू शकता.


  •  आधार कार्डची हिस्टरी चेक करणे.


आधार कार्ड इतिहास कसा तपासायचा?
1) सर्वप्रथम resident.uidai.gov.in या वेबसाइटला भेट द्या.
2) जिथे तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या My Aadhaar पर्यायावर क्लिक करावे लागेल.

3) त्यानंतर आधार प्रमाणीकरण इतिहास पर्यायावर क्लिक करा.
4) जिथे तुम्हाला आधार कार्ड क्रमांक विचारला जाईल तसेच कॅप्चा कोड भरावा लागेल.
5) त्यानंतर तुम्हाला OTP व्हेरिफिकेशन पर्यायावर क्लिक करावे लागेल.
6) त्याच वेळी, या प्रक्रियेनंतर एक टॅब उघडेल.
7) तुम्हाला आधार इतिहास कधीपासून कधीपर्यंत पाहायचा आहे, त्या तारखा भराव्या लागतील.
8) तसेच, ओटीपीसाठी रेकॉर्ड नंबर आणि मोबाइल नंबर टाकावा लागेल. यानंतर ओटीपीची पडताळणी करावी लागेल.
9) यानंतर आधार इतिहास तुमच्या समोर येईल. 

10) वापरकर्ते स्वत: आधार इतिहास डाउनलोड करू शकतात. 

 

  • आधार ऑनलाइन लॉक कसे करावे


UIDAI ला ऑनलाइन चेक करण्यासाठी आपल्याकडे 16 अंकाचा आधार क्रमांक असणे आवश्यक आहे.  जर वापरकर्त्याकडे  VID नसेल तर तो/ती SMS सेवा किंवा वेबसाइटद्वारे जनरेट करू शकतो.

वेबसाईटवर गेल्यानंतर तिथून तुम्ही तुमच्या आधारचा वापर कोठे कोठे होत आहे याची सर्व माहिती तपशीलरित्या पाहू शकाल. 


तुम्ही येथे तक्रार नोंदवू शकता


जर तुमच्या आधार कार्ड चा गैरवापर होत असल्याचे तुमच्या निदर्शनास आल्यास तुम्ही आधार कार्ड च्या टोल फ्री क्रमांक 1947 वर कॉल करून तक्रार करू शकता.  किंवा help@uidai.gov.in या ई-मेल आयडीवर तक्रार नोंदवता येईल.


चंद्र यान लँडिंग पहा



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url