ह्या महिलांना मिळणार मोफत शिलाई मशीन आणि 3 लाख कर्ज | PM Vishwakarma Yojana 2024
देशातील जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सरकार तर्फे वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात आजच्या ब्लॉगमध्ये आपण अशीच एका योजनेची माहिती घेणार आहोत की ज्या योजनेच्या माध्यमातून देशातील महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे तर मंडळी माहिती संपूर्ण पहा.
काय आहे पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सम्मान योजना
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेच्या अंतर्गत देशातील युवकांना व्यवसायिक प्रशिक्षण देण्याचे काम केले जाते. त्याचबरोबर प्रतिदिन 500 रुपयाचे स्टाइपेंड सुद्धा दिले जाते. आणि व्यवसाय करत असताना व्यवसायाच्या लागणाऱ्या गोष्टी खरेदी करण्यासाठी पंधरा हजार रुपयाची मदत सरकार तर्फे DBT च्या माध्यमातून केली जाते. या योजनेचा मुख्य उद्देश आहे की लोकांना स्वयंपूर्ण बनवणे व देशातील लघुउद्योगांना चालना देणें.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची सुरुवात केलेली आहे. योजनेच्या माध्यमातून युवकांच्या खात्यामध्ये पंधरा हजार रुपये ट्रान्सफर केले जातात आणि तीन लाख रुपये पर्यंतचे लोन दिले जाते. जेणेकरून लोन च्या माध्यमातून युवकांना नवीन व्यवसाय करत असताना प्रोत्साहन मिळेल.
PM Vishwakarma Yojana 2024 Overview
- योजनेचे नाव : प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना
- उद्देश : कौशल्य प्रशिक्षण आणि आर्थिक सहायता
- अर्ज कसा करावा : ऑनलाईन आणि ऑफलाइन
- अधिकृत वेबसाईट : pmvishwakarma.gov.in
- स्टाइपेंड : प्रति दिन 500 रुपये
योजनेचे मुख्य उद्दिष्टे
या योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या कौशल्याप्रमाणे प्रशिक्षण दिले जाते ज्या गरीब कुटुंबातील महिला शिलाई मशीनच्या माध्यमातून आर्थिक उदरनिर्वाह करत असतील अशा महिलांना शिलाई मशीन वापरण्याचे आणि कपडे शिवण्याचे प्रशिक्षण दिले जाते हे करत असताना लाभार्थ्याला दररोज पाचशे रुपये स्टायपेंड दिले जाते तसेच प्रशिक्षण व्यवस्थित रित्या पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र सुद्धा मिळते आणि लाभार्थ्याच्या बँक खात्यात प्रोत्साहन म्हणून पंधरा हजार रुपयाची रक्कम जमा केली जाते.
या योजनेच्या माध्यमातून आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना स्वयंरोजगाराची संधी निर्माण करून दिली जाते आणि ग्रामीण आणि शहरी भागातील बेरोजगारी कमी करण्यावर भर दिला जातो यामुळे महिला सबलीकरण ला सुद्धा प्रोत्साहन मिळते तसेच पारंपारिक कौशल्याचे आधुनिकरण सुद्धा होते आणि कुटीर उद्योग शिलाई मशीन सारख्या उद्योगांना चालना मिळते.
योजनेची पात्रता - PM Vishwakarma Yojana Eligibility
- अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
- अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त असावे.
- कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखापेक्षा कमी असावी.
- कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी कर्मचारी किंवा राजकीय पदावर नसावा.
- अर्जदार बीपीएल म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंब असावे.
योजनेची कागदपत्रे - PM Vishwakarma Yojana Documents
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मोबाइल नंबर
- रहिवाशी प्रमाण पत्र
- पॅन कार्ड
- बँक अकाउंट
- पासपोर्ट फोटो
अर्ज कसा करावा - How to apply for PM Vishwakarma Yojana
- सर्वात प्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
- नवीन पर्यायावर क्लिक करा.
- आवश्यक वैयक्तिक माहिती मोबाईल नंबर ईमेल आयडी भरा.
- त्यानंतर आपल्या मोबाईल नंबर वर ओटीपी आलेला आहे त्याची पुष्टी करा.
- एक युनिक युजरनेम आणि पासवर्ड तयार करा.
- युजरनेम , पासवर्ड वापरून लॉगिन करा आणि तुमची संपूर्ण प्रोफाईल तयार करा.
- शैक्षणिक पात्रता व्यवसायिक अनुभव आणि कौशल्य यांची माहिती द्या.
- आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
योजनेची अंमलबजावणी
पंतप्रधान विश्वकर्मा योजनेची अंमलबजात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाच्या सहकाऱ्यांनी केली जाते. प्रत्येक जिल्ह्यात एक नोडल एजन्सी स्थापन केली जाते. आणि त्या एजन्सीच्या माध्यमातून अर्जाची छाननी केली जाते. आणि लाभार्थ्याची निवड केली जाते.
निवड झालेल्या लाभार्थ्यांना व्यवसायिक प्रशिक्षण केंद्रामध्ये शिलाई मशीनचे प्रशिक्षण दिले जाते त्यामध्ये.
- शिलाई मशीन चा वापर आणि देखभाल कशी करावी.
- विविध प्रकारचे कपडे शिवण्याचे ट्रेनिंग.
- कापड निवड आणि पॅटर्न मेकिंग.
- फॅशन डिझायनिंग ची मूलभूत तत्वे.
- व्यवसायाचे व्यवस्थापन आणि वित्तीय साक्षरता.
- शिलाई मशीन चा वापर आणि देखभाल कशी करावी.
- विविध प्रकारचे कपडे शिवण्याचे ट्रेनिंग.
- कापड निवड आणि पॅटर्न मेकिंग.
- फॅशन डिझायनिंग ची मूलभूत तत्वे.
- व्यवसायाचे व्यवस्थापन आणि वित्तीय साक्षरता.
