NPS Vatsalya Scheme : काय आहे वात्सल्य योजना ? नेमका अर्ज कसा करायचा ? पात्रता, फायदे पहा

 

NPS Vatsalya Scheme : काय आहे वात्सल्य योजना ? नेमका अर्ज कसा करायचा ? पात्रता, फायदे पहा वाचा सविस्तर माहिती.



प्रत्येक आई-वडिलांना आपल्या मुलांच्या भविष्यांची काळजी असते. त्यासाठी आई वडील कष्ट करून काही पैसे त्यांच्या भविष्यासाठी जमा करून ठेवत असतात. जेणेकरून मुलांचे भविष्य सुखकारक होईल. याचाच विचार करून केंद्रीय निर्मला सीतारामन यांनी 2024 च्या अर्थसंकल्प सादर करत असताना एनपीएस वात्सल्य या योजनेची सुरुवात केली होती. आता ही योजना देशभरात 18 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आलेली आहे.

या योजनेच्या माध्यमातून पालक आपल्या मुलांचे भविष्य आर्थिक दृष्ट्या सुरक्षित करू शकणार आहेत, आणि ही मुलांच्या भविष्यासाठी आर्थिक दृष्ट्या महत्त्वाची योजना मांडली जाणार आहे. या योजनेच्या माध्यमातून आई वडील आपल्या मुलांच्या नावाने खाते उघडून त्यात नियमितपणे पैशाची गुंतवणूक करू शकणार आहेत. आणि या योजनेत वेळोवेळी गुंतवणूक करून पालक आपल्या पाल्यांसाठी मोठा पैसा जमा करू शकणार आहेत.

काय आहे वात्सल्य योजना ( What is NPS Vatsalya Scheme )

एनपीएस वात्सल्य योजना ही एक प्रकारची राष्ट्रीय पेन्शन योजना आहे. यामध्ये गुंतवणूकदार पालकांना अठरा वर्षाखालील मुलगा व मुलीच्या नावावर गुंतवणूक करता येणार आहे. एकदा का हे मूल 18 वर्षाचे झाले की ह्या योजना मधील खाते नियमित होणार आहे. तसेच या गुंतवणुकीतून पालकांना कर बचत तिचे सुद्धा फायदे मिळणार आहेत. तसेच आपण मुलांच्या भविष्यासाठी लवकरात लवकर गुंतवणुकीला सुरुवात केली तर चक्रवाढ पद्धतीने व्याजदर मिळाल्यामुळे मुलांच्या भविष्यातील शिक्षण व इतर कामासाठी मोठा पैसा गोळा होणार आहे.

NPS Vatsalya योजनेला जोरदार प्रतिसाद

या योजनेला देशभरातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे. या योजनेच्या माध्यमातून 18 सप्टेंबर 2024 रोजी म्हणजे पहिल्याच दिवशी दहा हजार मुलांच्या नावे खाते उघडण्यात आली आहेत. फक्त लहान मुलांच्या नावे नोंदणी करण्यात येते आणि त्यांना परमनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर देण्यात येतो.

NPS वात्सल्य योजनेसाठी पात्रता काय आहे ?

  • अर्जदार हा भारतीय नागरिक असावा
  • अर्जदाराचा मुलगा किंवा मुलगी चे वय 18 पेक्षा कमी असावे.
  • मुलाचे कायदेशीर पालक या योजनेसाठी खाते उघडू शकणार आहेत.

अर्ज करत असताना कोणकोणती कागदपत्रे लागतात (Required Documents for NPS Vatsalya Scheme)

  • पालकाचे ओळख पत्र (आधार कार्ड, पॅन कार्ड)
  • रहिवाशी दाखला
  • मुलाच्या / मुलगीच्या वयाचा पुरावा
  • मुलाचे ओळखपत्र (आधार कार्ड)
  • मोबाइल नंबर
  • ईमेल आयडी
  • पासपोर्ट साईझ फोटो

NPS वात्सल्य योजनेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा (How To Apply NPS Vatsalya Scheme)


या योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने घरबसल्या सुद्धा अर्ज करू शकणार आहात. मुलाचे आई वडील बँक , पोस्ट ऑफिस, पेन्शन फंड किंवा एनपीएस च्या माध्यमातून अर्ज करू शकणार आहेत. तसेच देशातील महत्त्वाच्या खाजगी बँका सुद्धा या योजनेसाठी अर्ज नोंदणी करून घेत आहेत.

एकदा का आपल्या अर्जाची नोंदणी झाली की आपण एक हजार रुपये भरून परमनंट रिटायरमेंट नंबर चे कार्ड आपल्याला दिले जाईल व त्याच्या माध्यमातून आपण भविष्यात सुद्धा गुंतवणूक करू शकणार आहात.

ऑनलाइन अर्ज करत असताना खालील स्टेप फॉलो करा.

  • अर्ज करण्यासाठी आपण eNPS पोर्टलवर जा किंवा enps.nsdl.com, nps.kfintech.com या वेबसाइट ला भेट द्या.
  • यानंतर नवे अकाउंट ओपन करण्यासाठी “Registration” पर्याय वर क्लिक करा.
  • पॅन नंबर, आधार कार्ड किंवा मोबाइल नंबरसह विचारलेली सर्व माहिती भरा. आणि रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करा.
  • आपल्या बँकेकडून केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या.
  • अर्ज ची नोंदणी केल्यानंतर आपणास कायम सेवानिवृत्ती खाते क्रमांक (PRAN) दिला जाईल.
  • आणि तुम्हाला फक्त्त १००० रुपय भरून हे खाते सुरू करता येणार आहे.

प्रत्येक वर्षी 10,000 रुपय जमा केल्यास लाभ मिळेल. ( NPS Vatsalya Calculator )

NPS Vatsalya योजनेत प्रत्येक वर्षी दहा हजार रुपये जमा केल्यास मुलगा किंवा मुलगी अठरा वर्षाचे होईपर्यंत किमान दहा टक्के प्रति वर्ष या दराने पाच लाख रुपये जमा होणार आहेत. तर आई वडील हीच गुंतवणूक वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत करत राहिल्यास आपणास दहा टक्के व्याजदराने सुमारे 2.75 कोटी रुपयांची लाभ मिळू शकणार आहे.

2000 रुपयांच्या SIP मध्ये 2.4 कोटींचा निधी

मंडळी जर आपले वय वर्ष 30 असेल आणि या योजनेच्या माध्यमातून दरमहा दोन हजार रुपयाची गुंतवणूक केल्यास आणि सरासरी 12% चा रिटर्न मिळाला तर हीच रक्कम निवृत्तीच्या वेळी म्हणजेच तीस वर्षांनी 70 लाख इतकी होईल. आणि फक्त पाच वर्षे अगोदर जर आपण ह्याच गुंतवणुकीला सुरुवात केली तर आपल्या निवृत्तीच्या वेळी हीच रक्कम 2 कोटी रुपये होईल. त्यामुळे लवकरात लवकर गुंतवणुकीचे महत्व समजून घ्या आणि ह्या योजनेचा लाभ घ्या.

Website : Click_here

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url