Online Ration Card : रेशन कार्ड ची सर्व माहिती आत्ता मोबाईल अँप वर मिळणारं

Groups
WhatsApp Group Join Now
Join Instagram Join Now
Telegram Group Join Now




Online Ration Card : रेशन कार्ड ची सर्व माहिती आत्ता मोबाईल अँप वर मिळणारं

आज आपण घरबसल्या रेशन कार्ड आपल्या मोबाईल वरून कशा प्रकारे काढता येईल याची माहिती घेणार आहे.

रेशन कार्ड हे प्रत्येक कुटूंबातील महत्वाचे कागदपत्र असते आणि जसे जसे कुटूंब वाढतील तसे रेशन कार्ड फोडून किंवा नवीन काढावी लागतात आणि हे करत असताना सामान्य जनतेला काम सोडून सरकारी ऑफिस ला जाणे होत नाही आणि काही लोक गेली तर सरकारी कामाच्या दिरंगाई खूप वेळ आणि पैसा फेऱ्या मारण्यात जातो.



ह्या सर्व गोष्टी चा विचार करून सरकारने आत्ता रेशन कार्ड घरबसल्या काढण्यासाठी किंवा ते नूतनीकरण ना साठी मोबाइल मध्ये अँप्लिकेशन तयार केले आहे आणि ह्या अँप च्या माध्यमातून आपण रेशन कार्ड ची सर्व माहिती घेऊ शकणार आहात.

मेरा रेशन 2.0 अँप - Mera Ration 2.0


सरकारने मेरा रेशन नावाने एक अँप गूगल प्ले स्टोर ला चालू केले आहे, ते आपण डाउनलोड करा आणि आपल्या रेशन कार्ड ची सर्व कामे घरातून करा. आत्ता आपल्यला हे करण्यासाठी धावपळ करावी लागणार नाही त्यामुळे आपला आर्थिक त्रास कमी होईल.

मेरा रेशन 2.0 च्या माध्यमातून काय माहिती मिळेल.

अँप डाउनलोड केले नंतर आधार कार्ड नंबर टाकून लॉगिन करावे आणि मग आपण पुढील माहिती पाहू शकता.

1) Manage Family details :

आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची माहिती शिधापत्रिकेत आहे कि नाही ते पाहू शकाल आणि घरातील नवीन नाव या मध्ये भरू शकणार आहात तसेच जुने नाव याच माध्यमातून काढू सुद्धा शकणार आहात.

2) Ration Entitlement :

या माध्यमातून आपण आपल्या कुटुंबाला किती रेशन सरकारतर्फे देण्यात येते याची संपूर्ण माहिती मिळू शकणार आहात,त्यामुळे आपल्याला मिळणारे रेशन व सरकारने दिलेले रेशन यातील फरक आपल्याला कळणार आहे.

3) Track my Ration :

याच्या माध्यमातून आपल्याला सरकारने दिलेले रेशन आपल्या रेशन दुकानापर्यंत पोहोचले आहे की नाही याची सुद्धा आपण माहिती घेऊ शकणार आहात. त्यामुळे आपल्याला रोज रेशन आले आहे की नाही हे पाहण्यासाठी दुकानाच्या चकरा मारावे लागणार नाही.

4) Benefits Received from Government :

या माध्यमातून शिधापत्र धारकांना रेशन कार्डद्वारे दिल्या जाणाऱ्या लाभाची माहिती घरबसल्या घेता येणार आहे म्हणजे सरकारने एखाद्यावेळी शिधापत्रिकेच्या माध्यमातून एखादी योजना राबवण्याचा प्रयत्न केलास त्याची माहिती आपल्याला मोबाईल वरूनच मिळणार आहे .

5) Ration Card Transfer :

या ॲपच्या माध्यमातून आपण आपले रेशन कार्ड दुसऱ्या व्यक्ती च्या नावावर ट्रान्सफर सुद्धा करू शकणार आहात, त्यासाठी आपल्याला कुठल्याही सरकारी कार्यालयाला भेट द्यावी लागणार नाही.

6) Surrender Ration Card :

जर तुम्हाला काही कारणास्तव आपल्या रेशन कार्ड बंद करायचे असेल तर तुम्ही या मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून घर बसल्या आपले रेशन कार्ड बंद करू शकणार आहात .

नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात

जर आपण नवीन रेशन कार्ड काढण्याचा विचार करत असाल तर आपल्याला खाली दिलेली कागदपत्रे करावी लागतील.

पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, रहिवासी दाखला, विज बिल, उत्पन्नाचा दाखला आणि घोषणापत्र.

अन्न व नागरी पुरवठा विभाग Website link : Click_here
 
Mera Ration 2.0 App link : Click_here


Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url