10वी उत्तीर्णांसाठी GMC कोल्हापूर येथे नोकरीची सुवर्णसंधी, पगार 63,200/- पर्यंत
10वी उत्तीर्णांसाठी GMC कोल्हापूर येथे नोकरीची सुवर्णसंधी, पगार 63,200/- पर्यंत
राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर येथे विविध पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. 10वी उत्तीर्ण असलेल्या इच्छुक उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील, आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.
भरतीची सविस्तर माहिती:
- एकूण रिक्त जागा: 95
रिक्त पदांचे नाव व पदसंख्या:
- प्रयोगशाळा परिचर (महाविद्यालय) – 01
- शिपाई (महाविद्यालय) – 03
- मदतनीस (महाविद्यालय) – 01
- क्ष-किरण परिचर (रुग्णालय) – 07
- शिपाई (रुग्णालय) – 08
- प्रयोगशाळा परिचर (रुग्णालय) – 03
- रक्तपेढी परिचर (रुग्णालय) – 04
- अपघात सेवक (रुग्णालय) – 05
- बाह्य रुग्णसेवक (रुग्णालय) – 07
- कक्ष सेवक (रुग्णालय) – 56
शैक्षणिक पात्रता:
- उमेदवार 10वी (एस.एस.सी.) उत्तीर्ण असावा.
- प्रयोगशाळा परिचर पदासाठी विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण आवश्यक.
- मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य.
- माजी सैनिकांसाठी विशेष शैक्षणिक अर्हता: 15 वर्षे सेवा व इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट किंवा तत्सम प्रमाणपत्र आवश्यक.
वयोमर्यादा (30 सप्टेंबर 2024 रोजी):
- सामान्य प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे
- मागासवर्गीय, खेळाडू, अनाथ, अत्यंत दुर्बळ घटक (आ.दु.घ): 5 वर्षे सवलत
परीक्षा शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹1000/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ: ₹900/-
पगार श्रेणी:
15,000/- ते 63,200/-
नोकरीचे ठिकाण:
कोल्हापूर
अर्ज प्रक्रिया:
- अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जानेवारी 2025
- अर्ज लिंक - https://rcsmgmc.ac.in/
10वी उत्तीर्ण उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी शासकीय संकेतस्थळाला भेट द्या आणि लवकरात लवकर अर्ज सादर करा!
