शक्तीमान स्प्रे बुम मशीन 50 एकरची फवारणी होईल एका दिवसात


नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण शक्तिमान या कंपनीचे फवारणी यंत्र पाहणारा ज्याच्या माध्यमातून आपण एका दिवसात 50 ते 60 एकरची फवारणी करू शकता.

Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now

शेतकऱ्यांना शेतीची कामे करत असताना खूप वेळ लागतो त्यातच सध्या मजुराची कमतरता हा मोठा विषय शेतीसाठी अडसर ठरत आहे. मजुराची टंचाई असल्यामुळे मजूर वेळेत मिळत नाही आणि शेतीचे महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण होत नाहीत आणि जर मजूर मिळाले तर मजुरीचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे.


शेतामध्ये सगळ्यात महत्त्वाचे आणि वेळेवर करावे लागणारे काम म्हणजे औषध फवारणी कारण रोग आणि किडीच्या नियंत्रण करता आपणास योग्य वेळी फवारणी करावी लागते नाहीतर रोगाचा प्रसार होऊन  पिकाची खूप मोठ्या प्रमाणात नासाडी होऊ शकते. पण यासाठी सुद्धा क्षेत्र मोठे असल्यास मजुराची आवश्यकता भासते अशावेळी एक ते दोन दिवसात औषध फवारणी पूर्ण होत नाही व त्यामुळे काही क्षेत्रांमध्ये किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना असे वाटते की असे कोणते यंत्र असेल की ज्याने एकाच दिवसात पाच दहा किंवा पन्नास एकर क्षेत्र मध्ये औषध फवारणी करून कीड नियंत्रण होईल व मजुराची आवश्यकता न लागता कामे ही होतील.


या सर्व गोष्टीचा विचार करून शक्तिमान या ॲग्री इक्विपमेंट बनवणाऱ्या कंपनीने एका यंत्राची निर्मिती केलेली आहे त्याचे नाव शक्तिमान प्रोटेक्टर 600 असे आहे ज्याच्या माध्यमातून शेतकरी एका दिवसात पन्नास एकर क्षेत्रावर फवारणी करू शकतात तर चला आपण खाली पाहू या यंत्राची वैशिष्ट्ये काय आहेत. 


Read : शेतातील तणांचा नायनाट करण्यासाठी रामबाण यंत्र शेतकऱ्यांना ठरेल वरदान, वाचा सविस्तर माहिती आणि किंमत


शक्तीमान प्रोटेक्टर विशेषतः विस्तृत श्रेणी आणि कव्हरेजसाठी डिझाइन केलेले आहे.याच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या कीटकनाशके, तन नाशक,  बुरशी नाशके आशा औषधांची फवारणी केली जाऊ शकते. तसेच कापूस सूर्यफूल भात मिरची यासारख्या जमिनीपासून उंच वाढणाऱ्या पिकावर सुद्धा सहजरीत्या फवारणी करता येते, व यंत्राची उंची जास्त असल्यामुळे पिकाचे कमीत कमी नुकसान होते. त्याची कॉम्पॅक्ट रचना, हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रॉलिक प्रणाली याचे  कार्य करण्यास सक्षम करते.


आता आपण औषध फवारणी यंत्राची रचना पाहूया .


या यंत्रामध्ये कॉलर कंपनीचे 22 एचपी चे इंजिन लावण्यात आले आहे यंत्राची जमिनीपासून ची उंची 1.2 मीटर आहे , या फवारणी यंत्राला चाके असून सर्व चाकांची रुंदी चार इंच आहे.चाकाची रुंदी कमीत कमी ठेवण्यात आली असल्यामुळे सरीतून जात असताना पिकाचे जास्त नुकसान होत नाही.


ह्या यंत्राला फवारणी करत असताना एका तासाला तीन लिटर डिझेलची गरज पडते. यंत्राला पावन पावर स्टेरिंग सुविधा देण्यात आली आहे व केबिन ही सुसज्ज बनवण्यात आली आहे. स्पयेर ची लांबी तीस फूट ठेवण्यात आली आहे आणि यामध्ये टोटल 20 नोजल लावण्यात आले आहेत. हे नोझल ८० डिग्री आणि 110 डिग्री मध्ये फवारणी करू शकता तर औषधाच्या टाकीमध्ये सहाशे लिटर औषध एका वेळी भरता येऊ शकते,तर यंत्रामध्ये रिवर्स आणि फॉरवर्ड असे दोन घेर देण्यात आलेले आहेत त्या दोन्हीच्या माध्यमातून आपण यंत्र चालवू शकता.


या मशीन चा उपयोग करून आपण मोठ्या प्रमाणावर क्षेत्र विकास दिवसात किंवा काही वेळा फवारणी करू शकता व इतर वेळामध्ये या मशीनचा उपयोग करून तुम्ही इतर शेतकऱ्यांची फवारणी करून पैसेही मिळू शकतात.


माहिती शेवटपर्यंत वाचल्याबद्दल धन्यवाद अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा 




Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url