PM किसान ट्रॅक्टर योजना पहा संपूर्ण माहिती | ट्रॅक्टर योजनेसाठी सरकार देते ५०% अनुदान
आज आपण पीएम किसान ट्रॅक्टर या भारत सरकारच्या योजनेची संपूर्ण माहिती खालील लेख मध्ये जाणून घेणार आहोत.
भारत सरकार देशातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आणि विकासासाठी प्रत्येक राज्यातील सरकारासोबत विविध योजना सुरू करत असते. कृषी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आणि शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थे मधील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची काळजी घेणे आणि त्यांना मदत करणे ही शासनाची प्राथमिक गरज आहे हे जाणून अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी शेतकरी कसे अधिक योगदान देऊ शकेल ,त्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्या सुख सुविधा पुरवल्या पाहिजेत याचा विचार करून भारत सरकारने PM किसान ट्रॅक्टर योजना सुरू करण्यात आली आहे.
![]() |
| kisan store |
नावाप्रमाणेच ही योजना नवीन ट्रॅक्टर शी संबंधित आहे. ट्रॅक्टर हा शेतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. तसेच न मिळणारे शेतमजूर आणि वाढलेले मजुरीचे दर त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करत असताना विविध अडचणी ना तोड द्यावे लागते.
त्यामुळे शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर उपलब्ध असल्यास शेतीतील बरीच कामे वेळेवर आणि कमी खर्चात होऊ शकतो तसेच ह्या ट्रॅक्टरचा उपयोग शेतकरी दुसऱ्याच्या रानातील कामे करून अर्थ प्राप्ती करण्यासाठी करू शकतो.
परंतु ट्रॅक्टरची किंमत जास्त असल्याने सर्व शेतकऱ्यांना ते परवडत नाही. अशा परिस्थितीत त्यांना ट्रॅक्टर भाड्याने घ्यावा लागतो, आणि त्यामुळे शेतीचा खर्च वाढतो. ही परिस्थिती लक्षात घेऊन शासनाने PM किसान ट्रॅक्टर योजना सुरू केली आहे.
सर्व पात्रता पूर्ण करणारे शेतकरी या योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी या पोर्टल वरू व्हिजिट करू शकता.
तर चला आता खाली आपण या योजनेची फायदे, वैशिष्ट्ये, पात्रता आणि इतर आवश्यक माहिती पाहणार आहोत.
पीएम किसान ट्रॅक्टर योजनेचे फायदे & वैशिष्ट्ये
- किसान ट्रॅक्टर योजनेसाठी पात्रता
- वय निकष
- अर्ज करणारे व्यक्तीचे वय अठरा वर्षापेक्षा जास्त आणि जास्तीत जास्त साठ वर्षापेक्षा कमी असावे.
- अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवासी असावा.
- कौटुंबिक उत्पन्न
- इतर निकष
- या योजनेत शेतकरी एकच ट्रॅक्टर खरेदी करू शकतो.
- अशा प्रकारच्या कोणत्याही सबसिडी योजना अंतर्गत अर्जदार पूर्वीचा लाभार्थी नसावा.
- अर्जदाराच्या नावावर शेतजमीन असणे आवश्यक आहे.
- अर्जदार लहान किंवा सीमांत शेतकरी वर्गात मोडणारा नसावा.
- अर्जदारांनी खात्री करावी की त्याने गेल्या सात वर्षात एकही ट्रॅक्टर खरेदी केलेला नाही.
अशाच शेतकऱ्यांचे अर्ज विचारात घेतले जातील. जे वरील सर्व अटीची पूर्तता करतात, आशा अर्जदारांच्या पात्रतेची पडताळणी अर्जदाराने सादर केलेल्या कागदपत्रे आणि प्रमाणपत्राच्या द्वारे केली जाईल.
- महत्वाची कागदपत्रे
अर्ज सादर करताना अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे त्यांच्यासोबत तयार ठेवणे आवश्यक आहे.
खालील कागदपत्रे शेतकऱ्यांनी अर्ज करत असताना आपल्या सोबत ठेवावीत.
अर्जदार शेतकऱ्यांनी अर्जात विचारल्याप्रमाणे सर्व गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच सर्व आवश्यक गोष्टी काळजीपूर्वक अर्जात भरले आहेत की नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करून घ्यावी.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- वैध ओळखपत्र- (जसे की मतदार आयडी, पॅन कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स)
- अर्जदाराच्या ताब्यात असलेल्या जमिनीची कायदेशीर कागदपत्रे
- बँक खाते तपशील / बँक पासबुक
- वर्ग प्रमाणपत्र
- अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
- अर्ज कसा भरावा
अर्जदार शेतकऱ्यांनी अर्जात विचारल्याप्रमाणे सर्व गोष्टींची माहिती देणे आवश्यक आहे. तसेच सर्व आवश्यक गोष्टी काळजीपूर्वक अर्जात भरले आहेत की नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करून घ्यावी.
तसेच योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. प्रत्येक अर्जदार शेतकऱ्यांनी खालील आवश्यक माहिती अर्ज भरत असताना चेक करावी.
- अर्जदार शेतकऱ्याचे नाव
- आधार कार्ड प्रमाणे आहे की नाही
- जन्मतारीख लिंग जात किंवा प्रवर्ग
- वडीलाची किंवा पतीचे नाव
- पूर्ण पत्ता
- जमिनीचा तपशील
- राज्याचे नाव
- बँकेचे तपशील जसे की बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आयएफएससी कोड इत्यादी
- ई-मेल
- चालू मोबाईल क्रमांक इतर आवश्यक माहिती
या योजनेच्या लाभ घेण्यासाठी अर्जदार शेतकऱ्यांनी महाडीबीटी या पोर्टलवरून ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
जर आपण ट्रॅक्टर अनुदान योजनेसाठी पात्र झालात तर महाडीबीटी पोर्टलवर आपणास या योजनेची लाभार्थी यादी मिळेल. लाभार्थी यादीमध्ये आपले नाव दिसेल. अशावेळी तुम्हाला सर्वप्रथम सर्व आवश्यक कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहेत.
यामध्ये आपण आपल्या ट्रॅक्टरचे आरसी बुक, आधार कार्ड, बँक पासबुक, सातबारा उतारा, ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट, कोटेशन इत्यादी सर्व कागदपत्रे अपलोड करणे गरजेचे आहे. ही कागदपत्रे तुम्हाला सात दिवसाच्या आत अपलोड करावी लागणार असून कारण सात दिवस पूर्ण झाल्यानंतर अर्ज ऑटोमॅटिक रद्द केला जातो याची नोंद घ्यावी. त्याकरता यादीमध्ये नाव आल्यानंतर अर्जदार शेतकऱ्यांना तात्काळ कागदपत्रे अपलोड करून घ्यावीत.
अर्ज करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी जवळच्या सीएससी केंद्राला भेट द्यावी.




