खुशखबर ! कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खुशखबर ! या तारखेपर्यंत अनुदानाचे पैसे खात्यावर जमा होणार


शेतीविषयक सल्ला आणि सरकारी योजनेची माहिती मिळवण्यासाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन व्हा. 👇

WhatsApp Group Join Now
Facebook Group Join Now

देशात कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. आणि महाराष्ट्र तर कांदा उत्पादनामध्ये एक अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्रामध्ये कांद्याची लागण तिन्हीही हंगामात केली जाते. आणि शेतकरी ही कष्ट करून कांदा मोठ्या प्रमाणात अलीकडच्या काळात उत्पादन करत आहे. पण कधी नैसर्गिक आपत्ती म्हणजेच वादळी पाऊस, दुष्काळ यामुळे कांदा पीक शेतकऱ्यांच्या हातातून जाताना दिसते.

कधी उत्पन्न चांगले होऊनही बाजार भाव न मिळाल्यामुळे शेतकरी बांधवांना आर्थिक ताण सहन करावा लागतो. कधी कधी कांद्याला भाव इतका कमी मिळतो की वाहतूक आणि इतर खर्चही या पिकातून निघत नाही. याचाच विचार करून महाराष्ट्र शासनाने कांद्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे.



पहा : PM किसान ट्रॅक्टर योजना पहा संपूर्ण माहिती |  ट्रॅक्टर योजनेसाठी सरकार देते ५०% अनुदान 

मागील काही वर्षात कांद्याच्या भावाची अवस्था खूप बिकट झाली आहे. कधी कधी कांद्याला खूप जास्त भाव येतो. पण व्यापारी मालाचा साठा करून ठेवतात व वाढलेला भाव शेतकऱ्यापर्यंत कधीच पोहोचत नाही. तर कधी कधी कांद्याचा भाव एवढा कमी होतो की शेतकऱ्याला मातीमोल दराने कांदा व्यापाऱ्याच्या हातात द्यावा लागतो.  याच गोष्टीचा विचार करून महाराष्ट्र शासनाने कांद्यासाठी सबसिडी देण्याचा निर्णय घेतला आहे.


अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला होता. आणि आता राज्य सरकार 15 ऑगस्ट पर्यंत कांदा अनुदानाची रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहे, अशी माहिती मिळाली आहे. सबसिडी मंजूर करून खूप दिवस झाले पण शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ती देण्यात आली नव्हती. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचा सरकारला विरोध होत होता आणि याविषयी स्पष्ट नाराजी हि दिसत होती. पण येणाऱ्या दहा दिवसात सबसिडी मिळेल असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे.


अशातच अजून एक मोठी बातमी कांद्याचा अनुदानाच्या बाबतीत आली आहे, ती म्हणजे कांदा अनुदान रक्कम महाराष्ट्र शासनाने 465 कोटी वरून आता 844 कोटी केली आहे. तसेच कांदा अनुदान करण्यासाठी लावण्यात आलेल्या जाचक अटी ही कमी करण्यात आलेले आहेत.  त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.

जाचक अटी कमी केल्यामुळे लाभार्थ्यांची संख्या वाढणार ही बाब लक्षात घेऊन अनुदानाची रक्कम 844 कोटी 56 लाख करण्यात आली आहे, जेणेकरून सर्व लाभार्थी शेतकरी बांधवांना अनुदान मिळावे हाच सरकारचे उद्देश आहे.

हे पहा : सोयाबीन पिकातील प्रमुख किडींची ओळख आणि नियंत्रण

सुरुवातीच्या काळामध्ये कांदा अनुदान कांदा पेऱ्यावर कांद्याची नोंद नसेल तर अशा शेतकऱ्यांना मिळत नव्हते.  पण अशा व अनेक 
जाचक अटी महाराष्ट्र शासनाने कमी केल्या आहेत. त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी पीक पेऱ्यावर कांदा पिकाची नोंद नसेल केली अशा शेतकऱ्यांनाही कांदा अनुदान देण्यात यावे, असा उल्लेख महाराष्ट्र शासनाच्या जीआर मध्ये करण्यात आलेला आहे. 


तसेच तलाठी ग्रामसेवक व इतर कृषी अधिकाऱ्यांना सरकारचा आदेश आहे, की पीक फेऱ्यावर कांदा पिकाची नोंद नसेल केली तरी अशा शेतकऱ्यांना लाभार्थी मध्ये सामावून घ्यावे. अधिक माहितीसाठी शेतकरी बांधव आपल्या गावातील तलाठी आणि ग्रामसेवक यांची भेट घेऊन अधिक माहिती घेऊ शकतात.  


तलाठी आणि ग्रामसेवक यांच्याकडून अनुदानाचे उतारे घेतल्यास तेही अनुदानासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत. तसेच सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे अनुदान उन्हाळी, रब्बी व पावसाळी कांदा पीक या तिन्ही हंगामातील पिकासाठी देण्यात येणार आहे. त्यामुळे या तिन्ही हंगामातील कोणताही हंगामात आपण कांदा पीक घेतले असल्यास आपणास अनुदान मिळणार आहे.


शासनाने कांदा अनुदानासाठी असणाऱ्या अनेक अटी कमी केल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे आम्ही जय किसान मार्फत शेतकऱ्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर आपल्या गावातील तलाठी ग्रामसेवकांची भेट घेऊन कांदा अनुदान मिळवण्यासाठी तत्पर असे प्रयत्न करावे व लवकरात लवकर  अनुदान कसे मिळेल हे पहावे.

आमच्या ब्लॉग ची माहिती शेवटपर्यंत वाचल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url