शेती सोबत हे व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरू करा आणि आर्थिक नफा मिळवा.  

 

Whatsapp Group Join Now
Facebook Group Join Now

नमस्कार शेतकरी मित्रांनो,

आर्थिक प्रगती पटकन करायचे असल्यास एकापेक्षा जास्त कमाईचे मार्ग शोधावे लागतील तर शेती करत असताना आपण ग्रामीण भागातच राहून आणि व्यवसाय करू शकता आणि आर्थिक कमाईचे मार्ग त्यातून शोधू शकता.  तर आजच्या लेखांमध्ये आपण शेती करत असताना कोणती व्यवसाय आपल्या गावामध्ये आपण सुरू करू शकतो. याविषयी सविस्तर माहिती आजच्या लेखांमध्ये पाहणार आहोत.

 

शेती करत असताना आपल्या तरुण शेतकरी मित्रांना वेगवेगळे व्यवसाय सुरू करण्याची इच्छा असतेच पण कोणता व्यवसाय करावा हे ठरवणे जर अवघड जाते किंवा कोणत्या व्यवसाय करावा हे पण समजत नाही.


त्यामुळे खाली काही शेतीपूरक उद्योगधंदे आम्ही सुचवत आहोत. त्याविषयी सविस्तर माहिती घेऊन आपण शेतीसोबत हे व्यवसाय चालू करून अर्थ प्राप्ती करू शकता.


मित्रानो हे पण पहा - आत्ता ट्रैक्टर ही इलेक्ट्रिक | Sonalika Tiger electric Tractor 2023


दूध डेअरी :

शेतकरी पूर्वीपासून शेतीसोबत गुरे व गायी ठेवत असतो. आणि ग्रामीण भागातील बऱ्याच लोकांच्या उत्पन्नाचा मार्ग हा दूध उत्पादन असतो. त्यामुळे आपण हा व्यवसाय अगदी कमी खर्चात सुरू करू शकता. आणि शेती सोबत अजून एक आर्थिक उत्पन्नाचा मार्ग यातून मिळवू शकता.

काही सहकारी दूध संघा कडून तरुण शेतकऱ्यांना दूध संकलन केंद्र सुरू करण्यासाठी आर्थिक व इतर मदत ही दिली जाते. तर आजच आपल्या जवळच्या सहकारी दूध संघाशी बोलून हा व्यवसाय चालू करा.

 

ऑरगॅनिक पालेभाज्या व्यवसाय :

आपण जर मोठ्या शहरापासून जवळ राहत असाल तर ऑरगॅनिक पालेभाज्या हा व्यवसाय सुरू करू शकता. ऑरगॅनिक भाज्यांना शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते.  व भाज्यांना दरही जास्त मिळत असतो. वाढत्या शहरीकरणामुळे भाजीच्या मागणीत तर कायमच वाढ होत आहे.

आपण आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या प पालेभाज्या लावू शकता. व शहराबरोबर आठवडी बाजारात ही त्या विकू शकता.

शक्यतो आपण छोट्या छोट्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या घ्याव्यात म्हणजे एका भाजीला दर न मिळाल्यास दुसऱ्या एखाद्या भाजीला चांगला दर मिळेल.  व जास्त नुकसान होणार नाही तसेच भाज्या लावत असताना मार्केटचा थोडासा अभ्यास केल्यास आपण अधिक नफा मिळवू शकता.


मित्रानो हे पण पहा - शेतकऱ्यांनी एकापेक्षा अधिक उत्पन्नाचे स्रोत कसे निर्माण करावेत ?

 

रासायनिक खते व कीटकनाशके दुकान :

शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी खते व औषधे लागतात, त्यामुळे हा व्यवसाय गावातच म्हणजे मागणीच्या ठिकाणी तुम्ही चालू करू शकता.

खते व औषधी विक्री सोबत जर आपण शेतकऱ्यांना पीक सल्ला व मार्गदर्शन दिल्यास नक्कीच मोठ्या प्रमाणात ग्राहकांचा प्रतिसाद आपणास भेटेल व त्यातून सुद्धा चांगले आर्थिक उत्पादन मिळवू शकाल.

 

पोल्ट्री फार्मिंग :

देशाची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अन्नधान्य बरोबर चिकन व अंडी यांची मागणी गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

त्यामुळे आपण या व्यवसायावर लक्ष केंद्रित करू शकता. तसेच कोंबडीचे  खत जवळच्या शेतकऱ्यांना विकून दुहेरी नफा ही मिळू शकता.



नर्सरी उद्योग:

भारतातील ग्रामीण भागातील शेतकरी सुद्धा विविध नगदी पिकाची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात.  त्यामुळे आपण अशा पिकाची चांगल्या प्रकारचे नर्सरी तयार करून विकल्यास चांगला प्रतिसाद मिळू शकतो. 

 उदाहरणार्थ:  

ऊस नर्सरी, फळभाज्या नर्सरी किंवा फुल झाडाची नर्सरी ही आपण तयार करून विकू शकता.

तसेच हा उद्योग सुरू करण्यासाठी आपणास दहा ते पंधरा गुंठे क्षेत्र  पुरेसे ठरते.  व शेतीची कामे करत करत आपण नर्सरीचा व्यवसाय अगदी सहजरीत्या सांभाळू शकता.

 

वर सुचवल्याप्रमाणे व बदलत्या काळानुसार शेतकऱ्यांनी सुद्धा शेती सोबत एक दोन व्यवसाय करायला हवेत, जेणेकरून आर्थिक प्रगतीला हातभार लागेल. 

वर सुचवलेल्या व्यवसायाबरोबरच आपण शेती करत असताना हार्डवेअरचे दुकान, मधुमांशी पालन, मशरूम शेती, फुल शेती व पिठाची गिरण हे अगदी कमी खर्चात होणारे व्यवसाय ही चालू करू शकता.

 

माहिती शेवटपर्यंत वाचल्याबद्दल आपले हार्दिक आभार व आपल्या काही सूचना असल्यास कृपया कमेंट मध्ये लिहा धन्यवाद. 






   

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url