मार्गदर्शन : भरघोस उत्पादनासाठी सोयाबीन पिकामध्ये किडींचे नियंत्रण कसे करावें.
नमस्कार नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन कीड नियंत्रण कसे करावे. व किडीच्या प्रादुर्भावातून सोयाबीनचा कसा बचाव करावा. याविषयी सविस्तर ची माहिती घेणार आहोत. त्यामुळे माहिती शेवटपर्यंत वाचा व हातचे सोयाबीनचे पीक घालू नका.
हे पण पहा : ठिबक सिंचनाचे ऊस पिकास आणि जमिनीस होणारे फायदे
हे पण पहा : कापूस - कीड व्यवस्थापन
मुख्यत्वे सोयाबीन वर खोडमाशी व केसाळ आळी आणि चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव दिसून येत असतो.
- खोड माशी
खोड माशी किडीची प्रौढ माशी खूप लहान म्हणजेच 1.9 ते 2.2 मिलि मीटर लांब असते. तिचा रंग चमकदार काळा असतो. फक्त पाय, स्पर्शिका व पंखाच्या शिरा फिकट तपकिरी रंगाच्या असतात. अंडी पांढरी व अंडाकृती असतात. आणि अळी पिवळी तोंडाच्या बाजूने टोकदार व मागील बाजूने गोळकर असते. तर कोश तपकिरी रंगाचा असतो.
सोयाबीन पेरणी नंतर जमिनीच्या वर आल्यावर मादी माशी सोयाबीनच्या वरच्या बाजूला पोखरून आत अंडी घालते. अंड्यातून अळी निघाल्यानंतर ती बीजदल पोखरते. त्यामुळे पीक वर वेड्या वाकड्या रेषा दिसतात, त्यानंतर तपकिरी होतात.
सुरुवातीला आळी पोखरत वरच्या बाजूला व नंतर खालच्या बाजूला जाते. मादीने पानावर वरच्या बाजूला पोखरून केलेल्या मार्ग वेडावाकडा दिसतो. सुरुवातीला हा मार्ग पांढरा वा नंतर तपकिरी दिसतो.
तीन पानाच्या अवस्थेत आळी खालच्या बाजूने पोखरते. आळी पान पोखरून शिरेपर्यंत पोहोचून शिरेतून पानाच्या देठांमध्ये शिरते. त्यानंतर खोडामध्ये शिरते.
अशाप्रकारे आळी सोयाबीनच्या खोडातील आतील भाग खात पूर्ण जमिनीपर्यंत पोहोचते. झाड मोठे झाल्यानंतर वरून या किडीचा प्रादुर्भाव आपणास दिसत नाही. पण जमिनी जवळ खोडा मधून माशी निघाल्यास खोडाला चित्र दिसते.
यामुळे झाडाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. व सोयाबीन पिकास योग्य अन्न तयार करता येत नाही. त्यामुळे फुले व शेंगा कमी लागतात, शेंगांमध्ये दाणे लहान व सुकलेले दिसतात आणि उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.
- चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव
या कीटकांचे प्रौढ भुंगे हलके तपकिरी आणि लहान मण्याएवढे असतात. त्यांचे पंख दोन रंगाचे असतात - त्यातील अर्धा भाग गडद तपकिरी असतो. आणि दुसरा अर्धा खूप गडद काळा असतो.
अळ्या म्हटल्या जाणार्या किड्या फिकट पिवळसर पांढर्या रंगाच्या असतात आणि त्यांचे शरीर पाय नसलेले गुळगुळीत असते, परंतु त्यांचे डोके मोठे असते. जेव्हा ते पूर्ण वाढतात, तेव्हा ते एका लहान काडीइतके लांब असू शकतात.
हा भुंगे त्याच्या आयुष्याच्या दोन टप्प्यांत पिकांना हानी पोहोचवू शकतो, जेव्हा तो लहान असतो आणि जेव्हा तो प्रौढ असतो. मादी भुंगे फांद्या, देठ आणि पानाच्या देठावर दोन वर्तुळे बनवते आणि मध्यभागी तीन छिद्रे करून अंडी घालते. ती छिद्रे करते तो भाग सुकतो.
जेव्हा मोठे वादळ येते तेव्हा त्यामुळे फांद्यांचं आणखी नुकसान होऊ शकतं. अळी झाडाच्या खोडाच्या आत जाऊन तुटते, ज्यामुळे झाडाला जास्त अन्न बनवता येत नाही.
यामुळे पिकांचे प्रमाण खूप कमी होते, कधीकधी 29 ते 83 टक्क्यांपर्यंत कमी होते. पावसाळ्यापूर्वी लागवड केलेल्या पिकांना सहसा सर्वाधिक नुकसान होते.
- केसाळ आळी
ही आळी प्रामुख्याने सूर्यफूल व कडधान्य या पिकावर दिसत असते गेल्या काही वर्षात महाराष्ट्रातील बऱ्याच मोठ्या भागात या किडीचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे.
एक तर सोयाबीनचे वाढलेले क्षेत्र पावसाची अनिमित्त आणि पेरणी मध्ये झालेला बदल या सर्व कारणामुळे सोयाबीनवर या किडीचा वाढता प्रभाव दिसत आहे.
ही किड पानाच्या खालच्या बाजूला कुंजक्याच्या स्वरूपात अंडी घालतो. अंड्यातून बाहेर आलेल्या नवजात आल्या पिवळसर रंगाच्या असतात. व पूर्ण वाढलेल्या आल्या च्या अंगावर भरपूर प्रमाणात केस दिसतात ह्या अळ्या प्रामुख्याने सोयाबीन पिकाची हिरवी पाने खातात त्यामुळे झाडाला फक्त पानाच्या शिरा शिरातच राहतात.
या किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास सोयाबीन विकास अन्न तयार करता येत नाही त्यामुळे सोयाबीनला फुले येण्यास किंवा दाणे भरण्यास हवी असणारी ताकद मिळत नाही त्यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम दिसून येतो.
त्यामुळे अशा अळीची शेतकरी बांधवांना लवकरात लवकर नियंत्रण करण्यासाठी उपाय योजना केल्या तर प्रभावपणे कीड नियंत्रण करता येईल अन्यथा पीक हातातून ही जाऊ शकते.
![]() |
| आत्ता ट्रैक्टर ही इलेक्ट्रिक | Sonalika Tiger electric Tractor 2023 |
उपाययोजना काय करू शकतो.
सूर्यफूल घेतलेल्या शेतामध्ये सोयाबीन शक्यतो घेणे टाळावे. शेतीचे बांध स्वच्छ ठेवावेत. अंडी व अळी असलेली पाने काढून टाकल्यास कीड लवकर नियंत्रण होतं.
किडीचे रासायनिक पद्धतीने नियंत्रण करायचे असल्यास क्विनॉलफॉस २५ इसी ३० मिली १० मिली १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
आणि प्रादुर्भाव जर जास्त असेल तर,
क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल १८.५ टक्के ३ मिली किंवा इमामेक्टीन बेंन्झोएट १.९ टक्के ईसी किंवा फ्लुबेन्डामाईड ३९.३५ टक्के एस सी ३ मिली किंवा इंडोक्झाकार्ब १५.८ टक्के इसी ७ मिली
या पैकी एका कीडनाशकाची प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
इतर उपाययोजना
- पिकाचे नियमित सर्वेक्षण करावे.
- पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत पीक तणमुक्त ठेवावे. बांधावर असणाऱ्या किडीच्या पर्यायी खाद्य वनस्पतींचा नाश करावा.
- आंतरमशागत निंदणी व कोळपणी वेळेवर करावी.
- खोडमाशी व चक्रीभुंग्याच्या प्रादुर्भावामुळे कीडग्रस्त पाने, फांद्या वाळतात. अशी कीडग्रस्त झाडे, पाने, फांद्या यांचा आतील किडीसह नायनाट करावा.
- जेथे खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर येतो, अशा ठिकाणी कोळपताना मोघ्याच्या साहाय्याने फोरेट (10 टक्के दाणेदार) दहा किलो प्रति हेक्टर जमिनीत ओल असताना पेरून द्यावे. कीटकनाशके पेरताना रबरी हातमोज्यांचा वापर करावा.
- खोडमाशी व चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालू नये म्हणून त्याकरिता सुरवातीलाच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
- कीड व्यवस्थापनासाठी 20 मि.लि. ट्रायझोफॉस (40 टक्के प्रवाही) किंवा 20 मि.लि. इथेफेनप्रॉक्स (10 टक्के प्रवाही) प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारावे. पॉवर स्प्रेसाठी कीटकनाशकाचे प्रमाणे तीन पट वापरावे.

