केंद्र सरकारची महिला उद्योगिनी योजना संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो,
आज आपण भारत
सरकारच्या एका अशा योजनेविषयी
पाहणार आहे. जी महिलांना
सक्षम करण्यासाठी व त्यांना छोटे
छोटे लघु उद्योग सुरू
करण्यासाठी कर्जपुरवठा आणि
महिलांना आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभा राहण्यास मदत
करते.
मोदी सरकारच्या या दहा वर्षाच्या कार्यकाळात आपण भरपूर योजना येताना पाहिले असतील. पण त्यातील च एक योजना म्हणजे महिला उद्योगिनी योजना होय.
हा केंद्र
सरकारचा महिलांना आत्मनिर्भर व आर्थिक दृष्ट्या
स्वावलंबनी करण्यासाठी तयार केलेली योजना
आहे.
या योजनेमध्ये प्रामुख्याने ग्रामीण भागातील तसेच आदिवासी प्रदेशात
राहणाऱ्या महिलांना प्राधान्य दिले जाते. व
ही योजना भारत सरकारच्या महिला
व बालविकास मंत्रालयाकडून राबवली जात आहे.
एटीएम शेती - एटीएम शेती मॉडेलद्वारे नियमित आर्थिक उत्पन्न
या योजनेमध्ये आतापर्यंत 50 हजार पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेऊन आर्थिक स्वावलंबन व यशस्वी लघु उद्योजक म्हणून वाटचाल सुरू करण्यात आली आहे.
|
महिला उद्योगिनी योजना |
|
|
व्याजदर |
बँकेच्या
नियमानुसार / इंटरेस्ट- फ्री लोन |
|
कर्जाची रक्कम |
3,00,000 |
|
प्रोसेसिंग
फी |
0 |
|
कौटुंबिक उत्पन्न |
1,50,000 |
- योजनेचे स्वरूप
1) या योजने मध्ये पात्र असणाऱ्या महिलांना किंवा महिलेला तीन लाख रुपये पर्यंतकर्ज देण्यात येते.
2) अर्जदार
महिलेचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे दीड लाख
रुपये पेक्षा जास्त नसावे.
3) अर्जदार महिला दिव्यांग असल्यास विधवा असल्यास कौटुंबिक उत्पन्न दीड लाख ही
मर्यादा लावली जात नाही.
अर्जदार महिला
इतर प्रवर्गातील असल्यास, 8 ते 10 टक्के या व्याज दराने
कर्ज पुरवठा केला जातो. तसेच
ज्या बँकेतून आपण कर्ज घेता
त्या बँकेच्या नियमानुसार व्याजदर कमी किंवा जास्त
होत असतो याची नोंद
घ्यावी.
- योजनेसाठी कोण पात्र असेल
1) या योजनेसाठी भारतातील 18 ते 55 वयोगटातील सर्व महिला पात्र
आहेत.
2) या योजनेसाठी अर्ज करत असताना अर्जदार महिलेने तिचा क्रेडिट स्कोर खात्री करून घेणे आवश्यक आहे.
जर अशा महिलेने
यापूर्वी कर्ज घेतले असेल
आणि त्या कर्जाची परतफेड
योग्य रीतीने केली नसेल , तर
अशा महिलांचा सिबिल स्कोर चांगला राहत नाही. व
अशा महिलांना बँक कर्ज देण्यात
असमर्थता दर्शवू शकतात.
- या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
1) पासपोर्ट
साईज दोन फोटोग्राफ
2) अर्जदार
महिलेचे आधार कार्ड किंवा
जन्माचा दाखला
3) अर्जदार
महिला दारिद्र्यरेषेखाली असल्यास
4) रेशन
कार्ड ची प्रति जोडावी
5) उत्पन्नाचा दाखला
6) रहिवाशी दाखला
7) जात पडताळणी प्रमाणपत्र
8) बँक
खाते किंवा पासबुक
- योजनेचा अर्ज कसा व कुठे करावा.
तसेच काही खाजगी वित्तीय संस्था देखील महिलांना या योजने अंतर्गत कर्ज देतात.
अधिक माहितीसाठी आपण खालील नंबर वर संपर्क साधू शकता
फोन नंबर - नवी दिल्ली - 011-457881125
