फक्त्त 10 वी पास वर ITBP मध्ये कॉन्स्टेबल ड्राइवर पदाची भरती | Indo-Tibetan Border Police ITBP Recruitment 2024
फक्त्त 10 वी पास वर ITBP मध्ये कॉन्स्टेबल ड्राइवर पदाची भरती
सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या आणि विशेष म्हणजे आर्मी किंवा पोलीस भरतीची तयारी करत असणाऱ्या उमेदवारांसाठी एक चांगली बातमी आलेली आहे आयटीबीपी मध्ये कॉन्स्टेबल ड्रायव्हर पदाची जाहिरात आलेली आहे या जाहिरातीच्या माध्यमातून आयटीबीपी मध्ये 545 जागा भरण्यात येणार आहेत याची सविस्तर माहिती आपण आजच्या ब्लॉगमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Join WhatsApp Group : Click_here
भरती संबंधी महत्त्वाची माहिती पुढील प्रमाणे आहे.
पदाचे नाव : कॉन्स्टेबल ड्रायव्हर
पदसंख्या : 545
वेतन श्रेणी : RS 21700 ते 69100/-
- दहावी उत्तीर्ण
- अवजड वाहन चालक परवानाधारक
वयाची पात्रता :
एक ऑक्टोबर 2024 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 27 च्या दरम्यान असावे. इतर वर्गातील उमेदवारांना रिझर्वेशन च्या नियमानुसार सूट देण्यात येणार आहे. SC/ST 05 वर्ष सूट आणि OBC 3 वर्ष सूट.
परीक्षा फी :
शैक्षणिक पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असताना खालील परीक्षा शुल्क भरावे लागेल. जनरल ,ओबीसी आणि इ डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारला रुपये शंभर फी भरावी लागेल तर एससी / एसटी उमेदवारांना कोणत्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही.
महत्त्वाच्या तारखा :
ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु तारीख : 08ऑक्टोंबर 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 नोव्हेंबर 2024.
अधिकृत वेबसाईट : Click_here
जाहिरात PDF : Click_here
महत्त्वाच्या सूचना :
- अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज भरल्यानंतर अर्जाची प्रिंट पुढील कामकाजासाठी आपल्या सोबत ठेवावी.
- परीक्षेला निर्धारित वेळेच्या एक तासा अगोदर उपस्थित राहावे.
- परीक्षेला जातांना हॉल तिकीट बरोबर आधार कार्ड , पॅन कार्ड व फी भरलेली पावती सोबत ठेवावी.
- वेळोवेळी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन आवश्यक माहिती घ्यावी.
