अबब 39000 जागा, फक्त दहावी पास वर विविध केंद्रीय सुरक्षा दलात नोकरीची संधी , फक्त्त 100 रुपये भरून लगेच अर्ज करा.

SSC GD Constable Bharti 2024

स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC ) मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदाची मेगा भरती घोषित करण्यात आलेली आहे. या भरतीच्या माध्यमातून आपण विविध केंद्रीय सशस्त्र दलामध्ये नोकरीची संधी मिळवू शकता.



एकूण 39481 रिक्त जागा साठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे, याकरता आपण खाली दिलेली शैक्षणिक पात्रता धारण करत असाल. ह्या भरती करिता आपण ऑनलाईन पद्धतीने नोंदणी 05 सप्टेंबर पासून करू शकणार आहात. तर अर्ज करण्याची अंतिम दिनांक 14 ऑक्टोंबर 2024 आहे.

भरती साठी महत्वाची माहिती पुढील प्रमाणे आहे.

SSC GD Constable Bharti 2024

पदाचे नाव आणि तपशील :

ह्या भरती मध्ये देशातील विविध केंद्रीय सशस्त्र दलामध्ये पदाची संख्या पुढील प्रमाणे देण्यात आली आहे.

  • पदाचे नाव – कॉन्स्टेबल (जीडी), रायफलमन (जीडी)
  • पदसंख्या –  39,481 जागा
  • Border Security Force (BSF) - 15654
  • Central Industrial Security Force (CISF) - 7145
  • Central Reserve Police Force (CRPF) - 11541
  • Assam Rifles (AR) - 1248
  • Sashastra Seema Bal (SSB) - 819
  • Indo-Tibetan Border Police (ITBP) - 3017
  • Secretariat Security Force (SSF) - 35
  • Narcotics Control Bureau (NCB) - 22

शैक्षणिक पात्रता

  • शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठातून 10वी वर्ग परीक्षा पास केलेली असावी.
  • वयोमर्यादा – 18-23 वर्षे

शारीरिक पात्रता

 पुरुष उमेदवार पात्रता :

  • उंची (सेमी) : 170cm - ST - उमेदवार : 162.5cm
  • छाती (सेमी): 80/5 - ST - उमेदवार : 76/5
  • पळणे - Running - 24 मिनिटांच्या आत 5 किलोमीटर चे अंतर धावणे.

महिला उमेदवार पात्रता :

  • उंची (सेमी) : 157cm - ST - उमेदवार : 150cm
  • पळणे - Running - 8.5 मिनिटांच्या आत 1.6 किलोमीटर चे अंतर धावणे.

परीक्षा फी :

सर्वसाधारण वर्गातील पुरुष उमेदवारांना रु. 100/- शुल्क भरावे लागेल, तर महिला उमेदवार आणि अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) यांना कोणतेही परीक्षा फी भरावी लागणार नाही.

अर्ज पद्धती – ऑनलाईन

ह्या भरती करीत फक्त्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावेत , ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्या.

ऑनलाईन अर्ज करत असताना खालील गोष्टी लक्ष्यात घ्या.

  • सर्वप्रथम, स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाइटवर https://ssc.gov.in/ ला भेट द्या.
  • प्रथम जाहिरात संपूर्ण वाचून घ्या आणि मग अर्ज सादर करा.
  • ऑनलाइन अर्ज सबमिट करण्यापूर्वी, उमेदवारांनी फॉर्मच्या प्रत्येक फील्डमध्ये योग्य तपशील भरला आहे हे चेक करावे.
  • ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर, कोणत्याही परिस्थितीत कोणताही बदल करता येणार नाही.
  • जर तुम्ही प्रथमच अर्ज करत असाल, तर “New User? Register Now” या लिंकवर क्लिक करा.
  • तुमचे नाव, ई-मेल आयडी, मोबाइल नंबर इत्यादी तपशील भरा.
  • यानंतर, तुम्हाला एक नोंदणी क्रमांक (Registration ID) आणि पासवर्ड प्राप्त होईल, जो तुमच्या ई-मेलवर पाठवला जाईल
  • नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करा.
  • लॉगिन केल्यानंतर, SSC GD कॉन्स्टेबल भरतीसाठीचा ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा.
  • वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, पत्ता इत्यादी माहिती अचूकपणे भरा.
  • फॉर्ममध्ये जाहिरात मध्ये दिल्या नुसार तुमचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.
  • फोटोचा आकार 20KB ते 50KB पर्यंत असावा, तर स्वाक्षरीचा आकार 10KB ते 20KB पर्यंत असावा.
  • शेवटी 100 रुपया परीक्षा फी भरून अर्ज पुन्हा एकदा चेक करून Submit” बटणावर क्लिक करा.

निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे असणार आहे.

  • संगणक आधारित चाचणी परीक्षा (CBE) : ही परीक्षा मल्टिपल चॉइस प्रश्नांणाची असेल.
  • शारीरिक चाचणी (PST) : उंची, छाती, वजन यांचे मापदंड तपासले जातील.
  • शारीरिक कार्यक्षमता टेस्ट (PET) : धावणे, उंच उडी, लांब उडी अशा कार्यक्षमतेच्या चाचण्या घेतल्या जातात .
  • वैद्यकीय आरोग्य चाचण्या घेतल्या जातील.
  • सर्व आवश्यक कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

वेतनश्रेणी :

ह्या भरती मध्ये निवड होणाऱ्या उमेदवाराला 21700 ते 69100 वेतन दिले जाईल.

  • ऑनलाईन अर्ज करा लिंक - https://ssc.gov.in/login
  • अधिकृत वेबसाईट -https://ssc.gov.in/
  • अर्ज सुरू होण्याची दिनांक  – 5 सप्टेंबर 2024
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक – 14 ऑक्टोबर 2024
Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url