लाडकी बहीणचे योजनेचे ऑनलाईन अर्ज झाले बंद ? | आत्ता कुठे अर्ज करावा लागणार , 30 सप्टेंबर पर्यंत करा अर्ज

 

Ladki Bahin Application Update

लाडकी बहीणचे योजनेचे ऑनलाईन अर्ज झाले बंद 


मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत सरकारतर्फे मोठे बदल करण्यात आलेले आहेत आता आपणास ऑनलाईन वेबसाईटवरून कोणत्याही प्रकारचे अर्ज करता येणार नाहीत कारण सरकारने ही सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे इथून पुढे आपल्याला कुठे अर्ज करावे याची सविस्तर माहिती पुढील प्रमाणे देण्यात आली आहे.

अत्ता पर्यंत किती बहिणींना ना लाभ मिळाला.

नवीन प्राप्त झालेल्या माहितीनुसार राज्यातील जवळजवळ एक कोटी 90 लाख महिलांच्या खात्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचे पैसे सरकारतर्फे जमा करण्यात आलेले आहेत, किंवा त्याची प्रक्रिया चालू झालेली आहे.

30 सप्टेंबर पर्यंत या योजनेच्या अर्ज स्वीकारले जाणार आहेत, अर्जाची संख्या घटल्याने किंवा राज्यातील काहीच हजार वर महिला चे अर्ज शिल्लक अर्ज बाकी असल्याने सरकारकडून आता केवळ अंगणवाडी केंद्रातच अंगणवाडी सेविका मार्फत अर्ज स्वीकारले जाईल असा नवा जीआर काढण्यात आलेला आहे.

कोणाकडे अर्ज करावेत.

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारण्याची जाबाबदारी आधी बालवाडी सेविका/अंगणवाडी सेविका, समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आंगणवाडी पर्यवेक्षिका, ग्रामसेवक व आपले सरकार सेवा केंद्र अश्या ११ प्राधिकृत व्यक्तींना देण्यात आले होते.
आता अंगणवाडी सेविकां व्यतिरिक्त इतर सर्व व्यक्तींना देण्यात आलेले अर्ज स्वीकारण्याचे अधिकार रद्द करण्यात आला आहे. याविषयीचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून फक्त अंगणवाडी केंद्रात अर्ज स्वीकारण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url