mukhymantri Majhi ladaki bahan Yojana | लाडकी बहीण योजनेचे पैसे का नाही आले ? खात्यावर आले कि नाही नेमकं कसे तपासणार
लाडकी बहीण योजनेचे पैसे का नाही आले ? खात्यावर आले कि नाही नेमकं कसे तपासणार
सध्या मुख्यमंत्री लाडके बहीण या योजने ची चर्चा सर्व माध्यमातून चालू आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना 15 ऑगस्ट 2024 पासून जुलै व ऑगस्ट महिन्याचे असे तीन हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आता सप्टेंबर महिन्यात ही काही महिलांना पैसे मिळायला सुरुवात होणार आहे.
काही महिलांचे अर्ज मंजूर होऊन सुद्धा अजून पैसे खात्यात जमा झालेले नाहीत, तर आपण आज पाहणार आहोत या योजनेचे पैसे का आले नसावेत.
सध्या कोणाला पैसे मिळत आहेत.
सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून पात्र महिलांना धर्मा 1500 रुपयांच्या आर्थिक मदत केली जात आहे. जुलै महिन्यापासून योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. पहिल्या टप्प्यात 15 ऑगस्ट पर्यंत महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये दिले गेले होते.
सध्या योजनेअंतर्गत वितरणाचा दुसरा टप्पा चालू होणार असून या दुसऱ्या टप्प्यात काही महिलांच्या बँक खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे तीन हजार रुपये 31 ऑगस्ट ते एक सप्टेंबर दरम्यान केले गेलेले आहेत.
आपले पैसे का आले नसावेत.
1) अर्ज छाननी चालू असेल.
राज्यातील जवळजवळ दोन कोटी पेक्षा जास्त महिलांचे अर्ज या योजनेसाठी सरकारकडे जमा झाले होते त्यामुळे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुमच्या अर्जाची छाननी चालू असेल.
2) अर्ज मंजूर झाला परंतु पैसे आले नाहीत.
काही महिलांचे अर्ज मंजूर झाले असे एसएमएस द्वारे कळविण्यात आले असले, तरीसुद्धा बँक खात्यामध्ये पैसे आले नाहीत असे दिसून येत आहे. तरी अशा महिला भगिनींना सांगण्यात येत आहे की सरकारकडून काही तांत्रिक अडचणी मिळून हे पैसे तुमच्या खात्यात वितरित झाले नसावेत.
किंवा आपले बँक अकाउंट आधार कार्ड सोबत सीटिंग केले नसावे. किंवा आपल्या खात्यात पैसे जमा झालेले असावेत व आपल्याला एसएमएस किंवा बँकेद्वारे कळविण्यात आलेले नसावे.
बँकेत पैसे जमा झालेत की नाही हे घरबसल्या कसे तपसावे.
लडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे. पात्र महिलांच्या बँक खाते पैसे सरकार तर्फे पाठवली ही गेली आहेत. परंतु बँकेद्वारे खातेदाराला हे पैसे क्रेडिट झालेले कळविण्यात आलेले दिसून येत नाही.
तर तुम्ही घरबसल्या खालील पद्धतीने बँकेमध्ये पैसे जमा झालेत की नाही हे तपासू शकता.
1) Call Customer care
बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा झालेली रक्कम किंवा शेवटची पाच देवाण-घेवांचे चेक करू शकता
2) Online Banking
तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या ॲप मधून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँकेच्या खात्यावर पैसे जमा झालेत की नाही हे चेक करू शकता.
3) Miss call alert service
तुमच्या बँक खात्यावर किती पैसे जमा झालेत हे तुम्ही बँकेच्या मिस कॉल अलर्ट सर्विस द्वारे ही तपासू शकता. त्यासाठी आपल्याला बँकेत नोंदणी केलेल्या मोबाईल नंबर वरून बँकेद्वारे देण्यात आलेल्या मिस कॉल अलर्ट नंबर वर मिस कॉल द्यावा लागेल.त्यानंतर आपल्याला काही मिनिटांनी आपल्या खात्याचा तपशीलवार बॅलन्स चा एसएमएस येईल.
तुम्ही प्रत्यक्ष बँकेत जाऊन लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेत की नाही हे सुद्धा तपासू शकता.
वर सांगितलेल्या सर्व गोष्टी करून झाल्या असतील आणि जर आपल्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा झाले नसतील, तरी आपण काही दिवस वाट पाहू शकता.
कारण सरकार तर्फे 14 ते 16 सप्टेंबर च्या दरम्यान 4500 रुपया जमा करण्यात येणार आहेत किंवा महिला व बाल विकास मंत्रालयाच्या 181 या नंबर वर कॉल ही करून माहिती घेऊ शकता.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने 9861717171 हा मोबाईल नंबर या योजनेच्या मदतीसाठी घोषित करण्यात आलेला आहे या नंबर वर सुद्धा आपण व्हाट्सअप च्या माध्यमातून माहिती घेऊ शकता.
Website : https://ladakibahin.maharashtra.gov.in/
