Aasha Swayamsevika Bhatta Increment | महाराष्ट्रातील गटप्रवर्तक आशा सेविकांच्या मानधनात झाली इतकी वाढ
महाराष्ट्रातील गटप्रवर्तक आशा सेविकांच्या मानधनात वाढ
महाराष्ट्रातील सर्व अशा सेविकांच्या संघर्षाला आता यश आलेला आहे आपण पाहत असाल की आशा सेविका देशातील नागरिकांच्या आरोग्यात सुधारणा होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्यामुळेच देशातील अशा सेविकांनी वेळोवेळी सरकारकडे मानधनांमध्ये वाढ करण्याची मागणी केलेली होती आता याच मागणीचा विचार करून राज्य सरकारने निर्णय घेतला आहे की अशा सेविकांच्या मानधनात चार हजार रुपयांची तर गट पर्यवेक्षकाच्या मानधनात सहा हजार रुपये दोनशे रुपयांनी वाढ करण्यात येणार आहे.
खाली आपण सविस्तर जीआर व इतर माहिती पाहणार आहोत राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या दिनांक 28 8 2024 रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठक मध्ये पुढील निर्णय घेण्यात आलेली आहेत.
महाराष्ट्रात राष्ट्रीय जवळजवळ 70000 आशा सेविका आणि 4000 हून अधिक पर्यवेक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे आशा सेविका यांनी मानधन वाढीसाठी आणि विविध मागण्यासाठी 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर 2023 या कालावधी मध्ये संप पुकारला होता. दरम्यान एक नोव्हेंबर रोजी आरोग्यमंत्र्यांनी विशेष अशी कृती समितीची बैठक घेऊन आशा वर्कर्स आणि गट पर्यवेक्षकांना दिवाळी बोनस म्हणून दोन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते.
तर आशा वर्करच्या मानधनाची वाढ केली जाईल असे सांगण्यात आले होते. याचबरोबर संपाच्या काळात काम पूर्ण झाल्यावर मानधन देण्याचे ही मान्य केले होते. मात्र गट पर्यवेक्षकांच्या मानधनाला समाधानकारक वाढ न झाल्याने संप पुन्हा लांबणीवर गेला होता, मात्र सरकारकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर आता हा संप मागे घेण्यात आलेला आहे.
वाढीव मानधन किती मिळणार
दोन दिवसापूर्वी झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये आरोग्य विभागाने आणि शासनाने घेतलेला आहे की आशा वर्कर्स आणि गट पर्यवेक्षकांच्या मानधनात वाढ करण्यात येणार आहे. असा GR सुद्धा काढण्यात आलेला आहे. अशा सेविकांच्या मानधनात सहा हजार रुपयांनी तर गट पर्यवेक्षकांच्या मानधन सहा हजार दोनशे रुपयांनी वाढ करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे.
यासाठी 2024 - 25 या आर्थिक वर्षाच्या अंतर्गत जवळजवळ 328.67 कोटी रुपये ची तरतूद करण्यात येणार आहे तसेच यातील 284 कोटी रुपये तातडीने देण्याचे आदेश सुद्धा सरकारने दिले आहेत त्यामुळे अशा सेविका व पर्यवेक्षकांना लवकरात लवकर वाढीव मानधन मिळणार आहे.
नवीन मानधन कशाप्रकारे असणार
- "गट प्रवर्तक” यांना राज्य शासनाच्या निधीतून अदा करण्यात येणा-या दरमहा रुपये ७२००/- या मानधनात दरमहा एकूण रुपये ४०००/- एवढी वाढ करण्यास मान्यता देण्यात आली.
- उपरोक्त प्रस्तावित केलेली वाढ एप्रिल, २०२४ या महिन्यापासून लागू करण्यास मान्यता देण्यात आली.
- सन २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये वाढीव दराने मानधन देण्यासाठी आवश्यक असलेली रु.१७.५९ कोटी इतक्या अतिरिक्त आवर्ती वार्षिक खर्चाची तरतुद पुरवणी मागणीद्वारे करण्यास मान्यता देण्यात आली.
- या अंतर्गत गेल्या तीन महिन्यांचे म्हणजेच ९१ दिवसांचे मानधन एकत्रितपणे दिले जाणार आहे. यासाठी ३२८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, २८४.१६ कोटी वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
