Best 5 scheme for women in Maharashtra | ह्या पाच योजने चा लाभ राज्यतील महिलांनी घेतला पाहिजेच
Best Government scheme for Women
ह्या पाच योजने चा लाभ राज्यतील महिलांनी घेतला पाहिजेच.
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांसाठी अनेक योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी सध्या आपण मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेचा लाभ घेत असाल, परंतु याच्या व्यतिरिक्त सरकारने अजून बऱ्याच योजना महिलांच्या कल्याणाकरता चालू केलेल्या आहेत. ज्या राज्यातील महिलांना मोठ्या प्रमाणात लाभ देत आहेत.
तर मंडळी आजच्या ब्लॉगमध्ये आपण महिलांसाठी अत्यंत उपयोगी अशा पाच खास योजनांची माहिती पाहणार आहोत.
लेक लाडकी योजना
महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील मुलींच्या शिक्षणाकरता व मुलींच्या सर्वांगीण विकास करता प्रोत्साहन देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत 2023 24 अर्थसंकल्पात ही नवीन योजना सुरू केली आहे.
राज्यातील आर्थिक दृष्ट्या सक्षम नसणाऱ्या कुटुंबातील मुलींच्या आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेली आहे. लेक लाडकी योजनेअंतर्गत वयाच्या 18 वर्षे मुलींच्या अकाउंट वर सरकारकडून ७५ हजार रुपयाची रक्कम दिली जाणार असून त्याचे उच्च शिक्षणासाठी ही मुलींना प्रोत्साहन दिले जाणार आहे.
मुलींना संपूर्ण उच्च शिक्षण मोफत
राज्यातील मुलींना महाराष्ट्र शासनाने मोफत शिक्षण देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये राज्य सरकारकडून उच्च व तंत्र शिक्षण विभाग कडून मोफत शिक्षण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेमध्ये ज्या मुलींच्या पालकांचे किंवा कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेच्या माध्यमातून आपण संपूर्ण व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी अगदी मोफत पूर्ण करणार आहोत.
महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सूट
राज्य शासनाने महिला अनेक योजना चालू केलेले आहेत, परंतु या योजनेचा लाभ घेत असताना महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रवास करावा लागतो. हीच बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने राज्यातील महिलांना एसटी प्रवासात 50 टक्के सवलत देण्याचा मोठा निर्णय वर्ष 2023 मध्ये घेतला आहे.
त्यामुळे राज्यातील महिलांना एसटी महामंडळाच्या सर्व गाड्यांमध्ये 50% सवलतीसह प्रवास करता येणार आहे. योजना राज्यातील सर्व म्हणजे 36 जिल्ह्यामध्ये लागू होणार आहे तर या योजनेचा लाभ आपल्या राज्याबाहेर प्रवासासाठी महिलांना घेता येणार नाही त्यासाठी त्यांना वेगळा तिकीट दर द्यावा लागेल.
महिला समृद्धी कर्ज योजना
राज्यात अनेक महिला पुरुषांच्या बरोबर व्यवसायात आपल्याला उतरताना दिसत आहेत. अशाच महिलांच्या व्यवसायाला प्रोत्साहन व चालना देण्यासाठी राज्य शासनाने महिला समृद्धी कर्ज योजना चालू केलेली आहे. ही योजना भारत सरकारच्या सामाजिक न्यायाने विशेष सहाय्य विभागाकडून राबवली जाते.
यामध्ये महिलांना किंवा महिलेला स्वतःचा उद्योग सुरू करण्यासाठी पाच लाख ते वीस लाख रुपयांचे कर्ज दिले जाते. यामध्ये कर्जाचा व्याजदर चार टक्के ठेवण्यात आलेला आहे त्याशिवाय कर्ज फेडण्यासाठी तीन वर्षाचा कालावधी मुदत देण्यात येत आहे. महिला समृद्धी कर्ज योजना योजनेचा लाभ शहरातील किंवा खेड्यातील महिला गट किंवा एखादी महिला सुद्धा घेऊ शकते व या कर्जाच्या माध्यमातून आपला व्यवसाय भरभराट करू शकते.
मुख्यमंत्री अन्नपूर्णे योजना
मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजनेचा शुभारंभ अर्थमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात केलेला आहे. या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार राज्यात राहणाऱ्या पाच सदस्य कुटुंबांना प्रत्येक वर्षी तीन सिलेंडर गॅस अगदी मोफत रूपात देणार आहे.
या योजनेचा लाभ घेत असताना आधार कार्ड, पॅन कार्ड, उत्पन्न दाखला, रहिवाशी प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, ओळखपत्र , पासपोर्ट आकाराचे फोटो अशा कागदपत्रांची आवश्यकता आपल्याला लागणार आहे.
तसेच घरातील महिलेच्या नावावर गॅसचे कनेक्शन असणे सुद्धा आवश्यक असणार आहे तरच आपल्याला योजनेचा लाभ मिळणार आहे आणि वर्षासाठी तीन सिलेंडर अगदी मोफत स्वरूपात भेटणार आहेत.
तर राज्यातील महिलांना आव्हान करता येत आहे की आपण या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी आपल्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयाला किंवा तहसीलदार कार्यालयाला भेट द्यावी, व मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ घेऊन आपला सर्वांगीण विकास साधावा.
