सांगली जिल्हा बँकेने आणली लेक लाडकी कन्यादान योजना , मिळणार विना परतावा दहा हजार रुपये

 


सांगली जिल्हा बँके लेक लाडकी कन्यादान योजना

सांगली जिल्हा सहकारी बँकेने विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी विना परतावा दहा हजार रुपयांची मदत करण्याचा मोठा निर्णय मंगळवार दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेतलेल्या आहे. ही बातमी सर्व शेतकरीच्या चेहऱ्यावर आनंद आणणार आहे .

यंदा आधी पाऊस झाल्यामुळे शेतकरी चे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेली आहे ही बाब लक्षात घेता बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी हा मोठा निर्णय घोषित केलेला आहे.

बँकेची सर्वसाधारण सभा आमदार मानसिंगराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी सभासदांना मार्गदर्शन करत असताना आमदार नाईक बोलत होते. जिल्हा बँकेने नेहमीच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतलेले आहेत. याचंच एक भाग म्हणजे जिल्हा बँकेकडून दोन लाख 90 हजार शेतकऱ्यांचा अपघाती विमा उतरवला आहे.


तसेच यापूर्वी मुलींच्या लग्नासाठी पन्नास हजार रुपयांचे कर्ज जाहीर केले आहे. बँकेच्या कार्यक्षेत्रात असणाऱ्या विकास सोसायटीतील कर्जदार सभासदांच्या मुलींच्या लग्नासाठी दहा हजार रुपये अगदी विना परतावा मदत करण्यात येणार आहे.

यासाठी बँकेने जवळ जवळ दहा ते अकरा कोटी रुपये ची तरतूद केलेली आहे. बँकेला दरवर्षी मिळालेल्या नफ्यावर इन्कम टॅक्स भरावा लागतो तर हा टॅक्स भारण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या मुलींचे लग्नासाठी हे पैसे देण्याचा निर्णय बँकेच्या संचालक मंडळाने 97 व्या वार्षिक सरासरी सभेत घेतलेला आहे.

जिल्ह्यातील शेतकरी नेहमीच नैसर्गिक आपत्तीचा सामना करत असतो, कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ मुळे मोठी आर्थिक त्रास शेतकरी सोसत असतो.

अशा कर्जदार सभासदांना मदत व्हावी म्हणून हा बँकेने निर्णय घेतला आहे अधिक माहितीसाठी जवळच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संपर्क करावा असे सांगण्यात आले आहे.



Next Post Previous Post
No Comment
Add Comment
comment url