लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार ? पहा सविस्तर माहिती || Ladaki_Bahin_Yojana
लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी येणार ? पहा सविस्तर माहिती
दोन हप्ते कोणाला आले.
ज्या महिलांनी 10 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले होते आणि ज्यांचे फॉर्म अप्रू झाले होते त्यांना आतापर्यंत दोन हप्ते आलेले आहेत, अशा महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे मिळून एकूण तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये सरकारकडून जमा करण्यात आलेले आहेत.
रुपया 4500 कोणाला मिळणारं
आता त्यानंतर फॉर्म भरलेल्या म्हणजेच 31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांना एकूण तीन हप्ते येणाऱ्या काही दिवसात येणार आहेत. ह्या तीन हप्त्याची एकूण चार हजार पाचशे रुपये रक्कम तिसऱ्या हप्त्याबरोबर महिला भगिनींच्या अकाउंट वर जमा होणार आहे . तर ज्या महिलांना आधी दोन हप्त्यांचे पैसे मिळाले असतील अशा महिलांना सप्टेंबर 14 ते 17 च्या दरम्यान फक्त पंधराशे रुपये येणार आहेत.
तिसरा हप्ता कधी येणार ?
पहिले दोन हप्ते 14 ते 17 ऑगस्ट च्या मध्ये देण्यात आला होता तर मिळालेल्या माहितीनुसार आता पुढील हप्ता एका महिन्याच्या अंतराने म्हणजेच सप्टेंबर महिन्याच्या 14 ते 17 तारखेच्या आसपास मिळण्याची दाट शक्यता आहे.
31 ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरणाऱ्या महिलांच्या फॉर्मची पडताळणीसाठी लागणारा वेळ पकडून हा हप्ता 15 तारखेच्या आसपास मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑनलाईन फॉर्म लिंक : Click Here
महिला व बालविकास हेल्पलाईन : 181
